Rahul Narvekar : ...तर मुख्य सचिवांवर हक्कभंग आणणार; विधानसभा अध्यक्षांचा इशारा

    13-Dec-2025   
Total Views |
Rahul Narvekar
 
नागपूर : (Rahul Narvekar) अधिवेशन संपेपर्यंत लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शनिवारी दिला.
 
हेही वाचा : Lionel Messi : भारतात मेस्सीच्या कार्यक्रमात संतप्त चाहत्यांकडून तोडफोड, लिओनेल मेस्सीच्या लवकर निघून जाण्याने उडाला गोंधळ!
 
अधिवेशन संपत आले तरीही आमदारांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींची उत्तरे अद्याप प्राप्त झालेली नाहीत, असा मुद्दा भाजप आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर बोलताना अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्‍याला असे वाटत असेल की, विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेले निर्देशांचे पालन करणे बंधनकारक नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला. (Rahul Narvekar)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....