NKT Tech Fest 2025 : एन के टी टेक फेस्ट 2025 जल्लोषात संपन्न; ५०० हून अधिक विद्यार्ह्यांचा उत्स्फूर्त सहभाग
13-Dec-2025
Total Views |
ठाणे : (NKT Tech Fest 2025) ठाणे येथील टी जे एज्युकेशन सोसायटीचे शेठ एन के टी टी महाविद्यालयात सायन्स अँड टेक्नोलॉजी विभाग आयोजित एन के टी टेक फेस्ट २०२५ (NKT Tech Fest 2025) - महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पाटील , उपमुख्यद्यापीका डॉ मानोशी बागची, एस एफ सी समन्वयक डॉ. योगेश्वरी पाटील, एन के टी टेक फेस्ट च्या अध्यक्षा डॉ. मनीषा नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी उत्साहात साजरा झाला.
यावेळी कार्यक्रमात स्किल टेक इंडिया चे डायरेक्टर प्राध्यापक डॉ. रबिंदर हेनरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्वांना सध्याच्या नवनवीन टेक्नोलॉजी बद्दल मार्गदर्शन केले खास करून कॉग्नेटिव्ह टेक्नोलॉजी आणि भविष्यात आत्मसात करावयाच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करावे असे आवाहन केले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी हीनल दिवानी, सिराजुद्दीन खान, शशिकांत माने, यश माने तसेच इतर शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.(NKT Tech Fest 2025)