मुंबई : (Ustad Zakir Hussain) गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain) यांच्या निधनाने कलाविश्वामध्ये शोककळा पसरली. एक दूरदर्शी तालवादक, संगीतकार आणि सहयोगी, हुसेन (Ustad Zakir Hussain) यांच्या प्रतिभेने भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीतापासून ते रॉक, पॉप, जाझ, जागतिक संगीत आणि त्यापलीकडे सीमा आणि शैली ओलांडल्या. आता एक वर्षानंतर त्यांना सांगितीक आदरंजली वाहण्यासाठी ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार एकत्र येत आहेत. दि. १४ व १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीमध्ये एनसीपीएमध्ये श्रद्धांजलीपार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Ustad Zakir Hussain) या कार्यक्रमात संगीत सादरीकरणे, व्याख्याने,छायाचित्र प्रदर्शन, माहितीपट, आदी गोष्टींचा समावेश आहे. सदर कार्यक्रम सशुल्क असून , या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बुक माय शो वर उपलब्ध आहेत.(Ustad Zakir Hussain)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.