Ladki Bahin Yojana : 'ई-केवायसी' दुरुस्तीसाठी लाडक्या बहिणींना मिळणार एकच संधी; मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

    13-Dec-2025   
Total Views |
Ladki Bahin Yojana
 
नागपूर : (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी केवळ एकच संधी मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे दिली.(Ladki Bahin Yojana)
 
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. ई-केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत."(Ladki Bahin Yojana)
 
हेही वाचा : Lionel Messi : भारतात मेस्सीच्या कार्यक्रमात संतप्त चाहत्यांकडून तोडफोड, लिओनेल मेस्सीच्या लवकर निघून जाण्याने उडाला गोंधळ!
 
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संधी
 
"ही योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे. त्यामुळे या महिलांना ई-केवायसी (Ladki Bahin Yojana) करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई-केवायसी (Ladki Bahin Yojana) मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे," असेही त्या म्हणाल्या.(Ladki Bahin Yojana)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....