मुंबई : (All India Seafarers Association) ऑल इंडिया सिफेरर्स युनियनतर्फे (All India Seafarers Association) मुंबईतील कंजूरमार्ग येथे डीजी शिपिंगच्या डेप्युटी डायरेक्टर जनरल (क्रू)कॅप्टन पी. सी. मीना यांची भेट घेण्यात आली. या बैठकीत विमानतळावर नाविकांना येणाऱ्या अडचणी, बनावट/संपादित डॉक्युमेंट्सची समस्या आणि एजंट्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कॅप्टन पी.सी.मीना तसेच डीजी शिपिंगच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अनेक महत्त्वाचे बदल करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती ऑल इंडिया सी-फेअरर्स असोशिएशनचे (All India Seafarers Association) अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.(All India Seafarers Association)
संजय पवार यांनी डीजी शिपिंगच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आश्वासनांची माहिती देताना सांगितले, फॉर्म–I पासपोर्टशी लिंक करण्यात येईल ज्यामुळे फॉर्म I मध्ये कोणत्याही प्रकारे एडिटिंग/छेडछाड होणार नाही. सीफेअर्स युनियन (All India Seafarers Association) आणि डीजी शिपिंग संयुक्तरीत्या संपूर्ण भारतात जागरूकता कार्यक्रम राबवणार आहे. एजंट ट्रेस-बॅक प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली करण्यात येईल जेणेकरून बनावट डॉक्युमेंट पुरवणाऱ्या खऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे शक्य होईल. ताब्यात घेण्यात आलेल्या नाविकांना कायदेशीर मदत व समुपदेशन करण्यात येईल जेणेकरून अडचणीत सापडलेल्या नाविकांना लगेच सहकार्य व मार्गदर्शन मिळेल.(All India Seafarers Association)
सर्वात महत्वाचे म्हणजे नाविकांवर होणाऱ्या एफआयआर टाळण्यासाठी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये नाविकांवर एफआयआर न करता थेट एजंट किंवा आरपीएसएलवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वस्त केले असल्याची माहितीत पवार यांनी दिली. ही बैठक भारतीय नाविकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि करिअरच्या संरक्षणासाठी एक मोठे पाऊल आहे. ऑल इंडिया सीफेअर्स युनियन (All India Seafarers Association) नाविकांच्या हक्कांसाठी नेहमीच लढत राहील आणि प्रणालीमध्ये पारदर्शकता व न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वाशी संजय पवार यांनी व्यक्त केला.(All India Seafarers Association)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.