Borivali Pattern : बोरीवली पॅटर्न म्हणजे नेमके काय?

    12-Dec-2025   
Total Views |
Borivali Pattern
 
मुंबई : (Borivali Pattern) मुंबईसह राज्यभरात सध्या बोरिवली पॅटर्न (Borivali Pattern) खूप गाजतो आहे. बोरिवलीचे आ. संजय उपाध्याय यांनी बोरिवलीतील (Borivali Pattern) रस्ते फेरीवाला आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी एक लढा उभारला आहे. या संपूर्ण विषयावर आ. संजय उपाध्याय यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला हा संवाद...(Borivali Pattern)
 
१) बोरीवली पॅटर्न नेमका काय आहे?
 
मुंबईत रेल्वे स्थानकावर उतरल्यावर प्रवाशांना स्टेशन समोरच्या रस्त्यावर चालायला जागा राहत नाही. बोरीवलीची (Borivali Pattern) अवस्था त्यापेक्षा वाईट होती. फुटपाथ आणि रोडवर कब्जा होता. निवडणूकीदरम्यान प्रचार करताना महिलांनी मला स्टेशनवरचे अतिक्रमण हटवण्याबाबत सूचना केली. सर्वोच्च न्यायलयाने रेल्वे स्टेशन परिसरात दीडशे मीटरपर्यंत फेरीवाले बसता कामा नये, फुटपाथ, रस्ते अतिक्रमणमुक्त असले पाहिजे, असे निर्देश दिले असतानाही अंमलबजावणी होत नव्हती. मी निवडून आल्यानंतर सर्वात आधी जेव्हा अधिकारी मला भेटायला आले मीसुद्धा एस.व्ही. रोडच्या मध्यभागी खुर्ची घेऊन बसलो आणि सांगितले जर त्यांच्यावर कारवाई होत नाही तर मीसुद्धा लाखो रुपये भाडे देऊन ऑफिस उघडणार नसून रस्त्यावर बसून माझे कामकाज सुरू करेन. परिणामी, महापालिकेने आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतले आणि फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली. एक वर्षांहून अधिक काळ झाला तरी बोरीवली स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त आहे. प्रशासनाची साथ घेतली त्यांच्यावर दबाव न टाकता, कुठलेही आंदोलन किंवा शिवीगाळ न करता सामंजस्याने ही कारवाई केली आणि म्हणून शासन दरबारी किंवा जनतेच्या मनात या कामाची जी दखल घेतली गेली त्याला बोरीवली पॅटन असे नाव लोकांनी दिले.(Borivali Pattern)
 
२) हा लढा तुम्ही नेमका कसा सुरू केला?
 
अनेक वर्षापासून मी सामाजिक जीवनात आहे. माझ्या मनात नेहमीच होते की, मला कधी काम करायची संधी मिळाली तर मी स्टेशन परिसर अतिक्रमणमुक्त करेन. स्टेशन परिसरात तिथले लोकसंख्याशास्त्र बदलण्याचे एक कट कारस्थान सुरु आहे. बोरीवलीमध्ये (Borivali Pattern) ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदू असूनही बाहेरून मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या बांगलादेशींसारखे फेरीवाले इकडे आले आहेत. तसेच तिकडे मशीद बांधण्याचा सुरु असलेलला प्रकार सुरक्षेच्या दृष्टीने घातक होता. म्हणून ही मोहीम मी हाती घेतली.(Borivali Pattern)
 
३) सर अनधिकृत झोपडपट्ट्या आणि फेरीवाल्यांमुळे नागरिकांना कोणता त्रास होत होता?
 
 रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर चालतासुद्धा येत नव्हते. रिक्षा, टॅक्सी मिळत नव्हती. स्टेशन परिसरात गेल्यावर किमान २० मिनिटे लागत असल्याने तिथे गाडी घेऊन जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे लोक त्या रस्त्यावर जाणे टाळायचे. याशिवाय गर्दी असल्याने पाकीटमारीचे प्रकारही वाढले होते. परंतू, आता हे प्रमाण कमी झाले आहे. आधी लोक दहिसरच्या पुलावरून जाऊन बोरीवलीमध्ये (Borivali Pattern) यायचे पण स्टेशन समोरच्या एस.व्ही. रोडला जाणे टाळायचे. रिक्षावाला भाडे नकारात होता आणि आत्ता रिक्षावाला तिकडे सहज जातो.(Borivali Pattern)
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना ‘बळीराजा रस्ते’ योजनेचा आधार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा  
 
४) या बोरीवली पॅटर्न अंतर्गत आतापर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आली?
 
जवळपास रोजच कारवाई होते. मी फेरीवाल्यांवर १६० पेक्षांहून अधिक गुन्हे दाखल केले. महानगरपालिकेने त्यांच्याकडून १० लाखांहून अधिक दंड वसूल केला. अनेक दुकानांवर, गार्डनच्या बाहेर गुटखा विकणाऱ्यांवर कारवाई झाली. स्टेशन परिसर किंवा संपूर्ण बोरीवलीमध्ये (Borivali Pattern) वाईन शॉप समोर दारू पिण्याला मी विरोध केला. आता जेव्हा मी मुंबईत प्रवास करतो तेव्हा या कामासाठी लोक माझे कौतुक करतात. अनेकजण बोरीवलीत होऊ शकते तर आपल्याकडे का नाही? असा विचार करतात. त्यामुळे कुठलीही प्रसिद्धी बॅनर पैसा खर्च न करता या कामामुळे मी लोकांच्या हृदयात आहे असे मी बोलू शकतो.(Borivali Pattern)
 
५) या सगळ्यात बांग्लादेशी आणि रोहिग्यांचा काही सहभाग आढळला का?
 
केंद्रीय मंत्री अमित शाह बोरीवलीत माझ्या प्रचारसभेत आले असताना बोरीवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही, अशी घोषणा मी केली होती. मी रस्त्यांच्या कामांची तपासणी करत असताना त्यातील सगळे मजूर हे बांगलादेशी-रोहिंग्या सापडले. त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या दोन जिल्ह्यांतील बोगस आधारकार्ड होते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या कानाकोपऱ्यातून कुणीही इथे येऊ शकतो. पण मुंबई धर्मशाळा नव्हे. बांग्लादेशी लोक इथे येऊन कब्जा करतील आणि नंतर इथली डेमोग्राफी, मतदार प्रक्रिया बदलतील, हा एकप्रकाणे जिहादच सुरु आहे. तुम्ही तुमच्या खऱ्या त्याच नावाने व्यवसाय करा. ओळख लपवून व्यवसाय का करता? हा एकप्रकारे धोका असून मी याचा विरोध केला आहे.(Borivali Pattern)
 
६) काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक धमकीचे पत्र आले होते. त्या पत्राचा आणि या बोरीवली पॅटर्न मोहिमेशी काही संबंध आहे का?
 
जेव्हा ही मोहीम सुरू केली तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये पोस्टाने एक पत्र आले. ज्यामध्ये एका पत्रकाराने आठ लोक मला मारण्याचे कटकारस्थान करत आहे, सावध राहा असे सूचित केले. त्या पत्राची पोलिसांनी दखल घेतली आहे. मी घाबरलो नाही तर माझ्या पत्नीला फोन करूनही सांगण्यात आले. पण, माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस आवश्यक पाऊल उचलतील, असा मला विश्वास आहे.(Borivali Pattern)
 
७) येणाऱ्या काळात हा बोरीवली पॅटर्न संपूर्ण राज्यभरात लागू व्हावा असे तुम्हाला वाटते का?
 
मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर कुठेही अतिक्रमण राहता कामा नये, असे माझे स्पष्ट मत आहे. लाखोच्या संख्येने लोक रेल्वे स्टेशनला येतात, अशावेळी त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. मी ही मोहीम हातात घेतली असून मला यात यश मिळत आहे. सरकारने फेरीवाल्यांना जागा द्यावी, माझा विरोध नाही. परंतू, सरकारी जागा आपली समजून त्यावर दादागिरी करणे सामान्य माणसाला आवडत नाही. बोरीवली पॅटर्न सगळीकडे लागू झाला व्हावा, हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे.(Borivali Pattern)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....