Babulnath Temple : राज्य सरकारकडून बाबुलनाथ मंदिराचा भाडेपट्टा ३० वर्षांसाठी ₹१ मध्ये नूतनीकृत; थकित भाडे माफ

    12-Dec-2025   
Total Views |
Babulnath Temple
 
मुंबई : (Babulnath Temple) राज्य सरकारने मुंबईतील सर्वात प्राचीन आणि पूजनीय मंदिरांपैकी एक असलेल्या बाबुलनाथ मंदिराला (Babulnath Temple) मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय नुकताच घेतला. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंदिर संकुलातील जमिनीच्या एका भागाचा भाडेपट्टा ३० वर्षांसाठी प्रतीकात्मक १ रुपया इतक्या भाड्यात नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होता.(Babulnath Temple)
 
अशी माहिती आहे की, बाबुलनाथ मंदिर (Babulnath Temple) ५,६७७ चौ.मी. क्षेत्रावर वसलेले आहे, त्यापैकी ७१८ चौ.मी. जमीन १९०१ पासून बाबुलनाथ टेंपल चॅरिटी ट्रस्टच्या भाडेपट्ट्यावर आहे. २०१२ पासून थकित असलेले भाडेपट्टा नूतनीकरण विविध शासकीय प्रक्रियांमुळे रखडले होते. आता राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्याने भाविकांच्या प्रवेशात आणि मंदिर प्रशासनाच्या कामकाजात सातत्य राहणार आहे. भाडेपट्टा नूतनीकरणासोबतच १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत जमा झालेल्या ३४.५७ लाख रुपयांच्या भाडे-थकबाकीची माफी देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर तहसीलदारांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये नोटीस बजावली होती. मात्र ट्रस्टने ही मागणी चुकीची असल्याचे सांगितले होते, कारण संबंधित जमीन कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी नव्हती आणि ती चुकीच्या वर्गवारीवर आधारलेली होती.(Babulnath Temple)
 
हेही वाचा : Asia's Largest GCC : आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत उभारणार  
 
ट्रस्टचा हा मुद्दा तेव्हा वेगाने पुढे आला जेव्हा मंदिराचे विश्वस्त नितीन ठक्कर यांनी मे २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेपाची विनंती करणारे पत्र लिहिले. या पत्रात ठक्कर यांनी स्पष्ट केले की वादग्रस्त भूखंड हा फक्त मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी मार्ग म्हणून वापरला जातो. व्यावसायिक दराने भाडे आकारणे अन्यायकारक असून सार्वजनिक हितासाठी चालणाऱ्या धार्मिक संस्थेवर अनुचित भार टाकणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. ही कारणे मान्य करत राज्य मंत्रिमंडळाने पूर्ण माफी दिली आणि जमीन अव्यावसायिक स्वरूपाची असून मंदिर सार्वजनिक सेवेत कार्यरत असल्याचा आधार घेत हा निर्णय घेतला.(Babulnath Temple)
 
ठक्कर यांनी सरकारला भाडेपट्ट्यावरील जमीन मुक्तधारक (freehold) म्हणून रूपांतर करण्याची विनंतीही केली होती, ज्यामुळे पूर्ण मालकी हक्क ट्रस्टकडे आला असता. परंतु हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. मुंबई तहसीलदारांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की विद्यमान मुक्तधारक धोरण केवळ निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी राखीव जमिनीसाठीच रुपांतरणास अनुमती देते. धार्मिक वापराच्या जमिनी या वर्गात येत नसल्याने फ्रिहोल्ड करण्यास परवानगी नाही. सध्या मात्र, भाडेपट्टा नूतनीकरणामुळे पुढील तीन दशकांसाठी मंदिराचा प्रवेशमार्ग आणि त्याचे कामकाज निर्विघ्न राहणार असून दररोज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.(Babulnath Temple)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक