Maharashtra Weather Update : थंडीचा जोर वाढला; महाबळेश्वरमध्ये 12.2 तर कल्याणचा 12.8 आणि डोंबिवलीचा पारा 13.4अंशांवर

    12-Dec-2025   
Total Views |
Maharashtra Weather Update
 
कल्याण : (Maharashtra Weather Update) शहरांतील तापमानाचा पारा दिवसागणिक कमी होत असल्याने थंडीचा जोर (Maharashtra Weather Update) वाढलेला दिसत आहे. शहरातील यंदाच्या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची शुक्रवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी नोंद झाली. देशभरात थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची (Maharashtra Weather Update) नोंद झाली तर कल्याणात त्यापेक्षा थोडे अधिक म्हणजे 12.8 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे.(Maharashtra Weather Update)
 
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा (Maharashtra Weather Update) पारा खाली खालीच येत चालला आहे. त्यामुळे शुक्रवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी यंदाच्या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी 11 डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये अवघ्या 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी कल्याण डोंबिवलीतील तापमान (Maharashtra Weather Update) आणखी कमी झाले असून कल्याणमध्ये तर चक्क 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर हिल स्टेशनमध्ये सर्वात लाडके डेस्टिनेशन असलेल्या महाबळेश्वर येथे 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. त्यापाठोपाठ डोंबिवलीचा पारा गुरुवारी 13.7 अंश सेल्सिअस होता. त्यात शुक्रवारी अजून कमी तापमान‌ म्हणजेच 13.4 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(Maharashtra Weather Update)
 
हेही वाचा : Babulnath Temple : राज्य सरकारकडून बाबुलनाथ मंदिराचा भाडेपट्टा ३० वर्षांसाठी ₹१ मध्ये नूतनीकृत; थकित भाडे माफ  
 
आज नोंदवण्यात आलेल्या तापमानाची आकडेवारी
 
कल्याण – 12.8°C
डोंबिवली – 13.4°C
पनवेल – 12.8°C
बदलापूर – 10.4°C
कर्जत – 10.7°C
नवी मुंबई – 14.4°C
विरार – 13.1°C
ठाणे – 14.5°C
डहाणू – 15.1°C
मुंबई (SCZ) – 14.9°C
रत्नागिरी – 16.1°C
माथेरान – 18°C
महाबळेश्वर – 12.2°C
लोणावळा – 11.9°C
आंबोली – 9.8°C