Priyank Kharge : कर्नाटक सरकारचा प्रियांक खरगेंना घरचा आहेर!

संघाच्या ५१८ पथसंचलनांमुळे कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही; गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती

    11-Dec-2025   
Total Views |
Priyank Kharge
 
मुंबई : (Priyank Kharge) कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यक्रमांना आणि पथसंचलनांना परवानगी देण्यावरून काँग्रेस नेत्यांनी विशेषतः मंत्री प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी नोंदवलेल्या आक्षेपांनंतर राज्य सरकारने विधानसभेत याबाबत सविस्तर स्पष्टीकरण सादर केले आहे. सरकारने स्पष्ट केले की यावर्षी राज्यात झालेल्या ५१८ पथसंचलनांपैकी कोणत्याही कार्यक्रमामुळे कायदा-सुव्यवस्थेवर कुठलाही नकारात्मक परिणाम झाला नाही.(Priyank Kharge)
 
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपा आमदार वी. सुनील कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी माहिती दिली की या सर्व पथसंचलनांमध्ये दोन लाखांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमांदरम्यान ना तणाव वाढला, ना कुठल्याही प्रकारची सांप्रदायिक किंवा सार्वजनिक अराजकता निर्माण झाली.(Priyank Kharge)
 
चित्तपुरमध्ये संघाच्या पथसंचलनाला परवानगी नाकारताना कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचा दाखला दिला होता. पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात संघाच्या कार्यक्रमांमुळे कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण झाल्याची एकही घटना घडलेली नाही. मंत्री प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांच्या कलबुर्गी मतदारसंघात यावर्षी ५१ पथसंचलने झाली, ज्यात ६ ते ७ हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते.(Priyank Kharge)
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : छोटे राज्य विकसित राज्य होऊ शकते यासाठी भाजपचा नेहमीच पुढाकार;
 
राज्य सरकारच्या माहितीप्रमाणे जिल्हाशः पथसंचलनांची संख्या अशी होती:
बेंगळुरू शहर – ९७
उत्तर कन्नड – ४५
बिदर – ४१
बागलकोट – ३३
शिवमोग्गा – १९
विजयपूर – १८
बेलगाव – १७
तुमकूर, चित्रदुर्ग, चिक्कमगलूर – प्रत्येकी ११
दक्षिण कन्नड, उडुपी, राईचूर – प्रत्येकी १०
 
कर्नाटकच्या उत्तर प्रांतातील सेडम येथे संघाचे संचलन अडवण्यचा संतापजनक प्रकार घडला होता. स्थानिक प्रशासनाने संचलन मार्गिकेवर बस लावून स्वयंसेवकांना ताब्यात घेतल्याचे समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झाले होते. संघ स्वयंसेवकांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही त्यांनी संचलनाबाबत लेखी स्वरूपात माहिती दिली होती. मात्र प्रशासनाने त्यावर कोणतेही उत्तर दिले नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी संचलन सुरू करण्याचा तेव्हा निर्णय घेतला. संध्याकाळी ५ वाजता संचालन सुरू होताच पोलिसांनी कारवाई करत स्वयंसेवकांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले. ही संपूर्ण घटना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र व मंत्री प्रियांक खरगे यांच्या सूचनेवरून घडल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता.(Priyank Kharge)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक