नागपूर : (Defence NOC) कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत डिफेन्सच्या एनओसीमुळे (Defence NOC) अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झाला असून सामान्य नागरिक यामुळे व्यथित आहे. त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेऊन रविवारी दुपारी ३ वाजण्यापूर्वी याबाबतचे निवेदन करावे, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिल्या.(Defence NOC)
मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आ. अमीत साटम यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या ५०० यार्डामध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकास गेल्या १६ वर्षांपासून थांबलेला असून बहुतांशी इमारती ४० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत. या इमारतींना मुंबई महापालिकेची नोटीस येऊ लागली आहे. या इमारतींमध्ये मध्यमवर्गीय कुटुंब राहत असून सदर कुटुंबावर रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे डीसीआरमध्ये यासंदर्भात प्रावधान करून जुहु मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशनच्या ५०० यार्डामध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग काढावा. हे अधिवेशन संपण्याच्या आधीच सदर धोरण आणि नियमांचे निवेदन शासनाने करावे.”(Defence NOC)
“तसेच डी. एन. नगर येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या ट्रान्समीटर स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातसुद्धा उंची मर्यादा असल्याने या परिसरातील इमारतींचा पुनर्विकास खोळंबला आहे. याठिकाणच्या इमारती गेल्या ४० वर्षांपासून असून त्यांनाही मुंबई महापालिकेची सी वनची नोटीस येणे सुरु झाली आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणात मराठी माणसे राहत असून त्यांनाही रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे डी. एन. नगर येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या ट्रान्समीटर स्टेशनच्या टॉवर्सला इतरत्र हलवावे. लवकरात लवकर उंची मर्यादा शिथिल करून इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा,” अशी मागणी त्यांनी केली.(Defence NOC)
त्यानंतर आ. अतुल भातखळकर यांनी सेंट्रल आर्डिनेंस डेपो(सीओडी) परिसरातील इमारतींचा पुनर्विकास लोंबकळलेला असून या संदर्भात राज्य सरकारने लोकांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका तात्काळ घ्यावी, अशी मागणी केली. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकारने बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.(Defence NOC)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....