नवी दिल्ली : ( Ravindra Chavan Meets Amit Shah for Election Talks ) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आगामी निवडणूकांसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेचा सारांश चव्हाण यांनी शाह यांच्याकडे सोपवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून हे अधिवेशन संपल्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची भेट घेतल्याचे समजते.
रवींद्र चव्हाण यांनी मध्यरात्री अमित शाह यांच्याशी संघटनात्मक चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने होणारी युती आणि जागावाटपासंदर्भातही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....