Luthra Brothers Detained : गोव्यातील नाईटक्लब प्रकरणी फरार लुथरा बंधू थायलंडमध्ये अटकेत!

    11-Dec-2025   
Total Views |

Luthra Brothers Detained

मुंबई : (Luthra Brothers Detained) गोव्यातील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लब आग दुर्घटना प्रकरणातील क्लबचे फरार मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथराला थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारतीय दूतावासाला याची माहिती देण्यात आली असून, त्यांना भारतात परत आणण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नाईट क्लबला लागलेल्या या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.(Luthra Brothers Detained)

लुथरा बंधूंच्या मुसक्या कशा आवळल्या?

थायलंड पोलिसांनी लुथरा भावांना फुकेतमधून ताब्यात घेतले. ७ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता या दोघांनी फुकेतच्या विमानातून उड्डाण केले. या दोन्ही भावांच्या विरोधात इंटरपोलने लगेचच 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी केली. गोवा पोलिसांनी सीबीआय व इंटरपोलशी सातत्याने संपर्क साधल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली. यानुसार फुकेतमधील पोलिसांनी त्यांचा माग काढत गुरुवारी ११ डिसेंबरला अखेर त्यांना ताब्यात घेतले. आता त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.(Luthra Brothers Detained)

माहितीनुसार, सौरभ लुथ्रा व गौरव लुथ्रा हे दोघे भाऊ शनिवारी रात्री क्लबला लागलेल्या भीषण आगीनंतर अवघ्या काही तासांतच थायलंडला फरार झाले होते. शनिवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास लुथ्रा यांच्या बर्च नाईट क्लबला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. पुढच्या दोन तासांत म्हणजेच १ वाजून १७ मिनिटांनी लुथ्रा बंधूंनी थायलंडची तिकिटे बुक केली होती. ७ डिसेंबरच्या पहाटे ५.३० च्या फ्लाईटने देशाबाहेर गेले. अशी माहिती पोलिसांनी आपल्या निवेदनात दिली आहे. पोलीस व अग्निशमन दल आग विझवण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी मात्र देश सोडून जात होते, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. नाईट क्लबला लागलेल्या या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.(Luthra Brothers Detained)

कोर्टात धाव

अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी लुथरा बंधूंनी बुधवारी दिल्लीतील रोहिणी कोर्टात 'अटकपूर्व जामीन' मिळावा, यासाठी अर्ज केला होता. पण, न्यायालयाने त्यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.(Luthra Brothers Detained)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\