Overseas Scholarship Scheme : परदेशी शिष्यवृत्ती योजना कोट्यात वाढ

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

    11-Dec-2025
Total Views |
Overseas Scholarship Scheme
 
नागपूर : (Overseas Scholarship Scheme) "परदेशी शिष्यवृत्ती योजना (Overseas Scholarship Scheme) सन २०१७ मध्ये फक्त १० विद्यार्थ्यांपुरती मर्यादित होती. या कोट्यात वाढ करण्यात येऊन हा कोटा प्रथम ५० आणि आता ७५ विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पुढील काळात हा कोटा आणखी वाढविण्यात येईल."म्हाडा व सिडको मार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांमध्ये आरक्षण संदर्भात विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात येईल. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी सात जिल्ह्यात जागा मिळाली आहे."असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवार दि. १० रोजी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.(Overseas Scholarship Scheme)
 
"ओबीसी व इतर वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व उन्नतीसाठी राज्य शासन अनेक योजना, उपक्रम राबवित असून या योजनांना अधिक गती दिली जाईल."असे अतुल सावे म्हणाले.(Overseas Scholarship Scheme)
 
हेही वाचा : Luthra Brothers Detained : गोव्यातील नाईटक्लब प्रकरणी फरार लुथरा बंधू थायलंडमध्ये अटकेत!  
 
सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत, डॉ.परिणय फुके आणि राठोड यांनी सहभाग घेतला.(Overseas Scholarship Scheme)
 
"मोठ्या शहरात इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू केली जातील. ज्या विद्यार्थ्यास वसतीगृहात प्रवेश मिळाला नसेल त्याला आधार व स्वयंंयोजनेचा लाभ दिला जात आहे. तसेच परदेशातील शिक्षणासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज महामंडळातून, तर देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी ऑनलाईन पोर्टल व मॉनिटरिंग प्रणाली तयार करण्यात आली आहे."असे मंत्री सावे म्हणाले.(Overseas Scholarship Scheme)