Fruit Crop Insurance Scheme : फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी मुदतवाढ

    11-Dec-2025
Total Views |
Fruit Crop Insurance Scheme
 
ठाणे : (Fruit Crop Insurance Scheme) कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांकरीता आंबिया बहार सन 2025-26 मधील आंबा व काजू या पिकांसाठी सहभाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य सांख्यिक कृषि आयुक्तालय पुणे यांनी दिली आहे.(Fruit Crop Insurance Scheme)
 
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारमध्ये राबविण्यात येते. कोकण विभागात आंबिया बहार 2025-26 मध्ये आंबा व काजू या पिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर,2025 होती. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर सहभाग घेता येत नव्हता. त्यामुळे सहभागाचा कालावधी वाढवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली आहे.(Fruit Crop Insurance Scheme)
 
हेही वाचा : Defence NOC : डिफेन्सच्या एनओसीमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अधिवेशनापूर्वी सोडवा
 
कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांकरीता आंबिया बहार सन 2025-26 मधील आंबा व काजू या पिकांसाठी सहभाग घेण्यासाठी दि.15 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन फळपिक विमा विमा योजनेत मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे शिवाजी आमले यांनी केले आहे.(Fruit Crop Insurance Scheme)