नागपूर : (Chief Minister's Relief Fund) मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister's Relief Fund) ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये इतकी आहे. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांना दिले.(Chief Minister's Relief Fund)
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister's Relief Fund) ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी फक्त ७५ हजार रुपये खर्च केले, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंबादास दानवे जी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister's Relief Fund) ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये इतकी आहे."(Chief Minister's Relief Fund)
"मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister's Relief Fund) दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच (Chief Minister's Relief Fund) मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून १४ हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Chief Minister's Relief Fund)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....