रणवीर सिंगच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत 'ही' पात्रं ठरली सुपरहीट

    10-Dec-2025
Total Views |

मुंबई :अभिनेता रणवीर सिंगची जादू सध्या बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. तब्बल २ वर्षांनी रणवीरने सुपरहीट कमबॅक केला आहे. तर यावर्षी रणवीरला सिनेविश्वात १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या धुरंधर सिनेमातून रणवीर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या १५ वर्षात त्याने अनेक सुपरहीट सिनेमे दिले तर अनेक पात्र सुद्धा गाजवली आहेत. पण रणवीरने अगदी वेगळ्या क्षेत्रातून आपल्या करियरची सुरुवात केली होती.

दरम्यान, रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ ला मुंबईतील एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. रणवीरचे बालपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं, त्यामुळे तो शालेय नाटकांमध्ये आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात तो भाग घेत असे. मुंबईच्या एचआर कॉलेजमधून त्याने कॉमर्सचे शिक्षण घेतले. यादरम्यान रणवीर सतत ऑडिशन्स देत होता पण त्याची कुठेही निवड होत नव्हती. त्यानंतर रणवीरला कळून चुकलं होतं की बॉलिवूडमध्ये एंट्री करणं काही सोपं काम नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अभिनयाचं शिक्षण सुरु केलं.

पण अनेकांना माहित नसेल, जेव्हा सुरुवातीच्या काळात रणवीरला कोणताही चित्रपट मिळत नव्हता तेव्हा त्याने एका जाहिरात एजन्सीमध्ये लेखक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या काळात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. पण रणवीरला नेहमीच अभिनेता बनायचं होतं. पण अनेक ठिकाणी ऑडिशन देऊनही त्याला छोट्या भूमिका मिळत होत्या.

दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्राने रणवीर सिंगला पहिला ब्रेक दिला होता. रणवीरने 'बँड बाजा बारात' या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, जी आदित्य चोप्राला खूप आवडली आणि त्याने या चित्रपटात बिट्टू शर्माच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला निवडलं. या चित्रपटातून रणवीरला बॉलीवूडमध्ये एंट्री मिळाली होती, या चित्रपटात त्याला एका सामान्य दिल्लीतील मुलाची भूमिका साकारायची होती. अशा परिस्थितीत रणवीरने या भूमिकेसाठी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अनेक दिवस घालवले आणि तेथील वातावरण जाणून घेतले. हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी रणवीरला सर्वोत्कृष्ट बेस्ट मेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला तब्बल १५ पुरस्कार मिळाले होते.

वर्षभरात आला होता दुसरा चित्रपट वर्षभरात रणवीरला दुसरा चित्रपट मिळाला आणि २०११ मध्ये त्याचा 'लेडीज वर्सेस रिकी बहल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील रणवीरच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले होते. पण रणवीरच्या करिअरमधील पहिला सुपरहिट चित्रपट 'गोलियों की रासलीला रामलीला' होता. या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाची जोडी चांगलीच पसंत केली गेली होती. त्यानंतर ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातही दोघांनी प्रेक्षकांच्या मानत वेगळं स्थान निर्माण केलं.

रणवीरने आजवर केलेल्या कामातून फक्त प्रेक्षकांची वाहवा मिळवली नाही तर त्याची बरीच पात्र ही प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ‘बँड बाजा बाराती’चा बिट्टू शर्मा, ‘रामलीला’चा राम, ‘बाजीराव मस्तानी’मधील, पेशवे बाजीराव, ‘पद्मावत’मधील सुलतान अल्ल्हाउद्दीन खिलजी, ‘सिंब्बा’चा संग्राम भालेराव, ‘गली बॉय’चा मुराद अहमद, ‘८३’ मधील कपिल देव, ‘रॉकी ऑर राणीकी प्रेम कहानी’चा रॉकी रंधावा आणि ‘धुरंधर’चा हमजा अली मझारी रणवीरच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीतील ही काही लक्षात राहीलेली पात्रं.