मुंबई : (India-EU trade deal) भारत आणि युरोपियन संघ (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींना गती मिळाली असून कराराची विस्तृत रूपरेषा अंतिम करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. तसेच दोन्ही बाजू शक्य तितक्या लवकर हा करार पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असेही ते म्हणाले. (India-EU trade deal)
भारत आणि युरोपीय संघ (EU) यांच्यातील या मुक्त व्यापार कराराला (FTA) अंतिम रूप देण्यासाठी ८ ते ९ डिसेंबर रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मंत्री पीयूष गोयल यांनी युरोपीय महासंघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश शेफचोव्हिच यांच्याशी सखोल द्विपक्षीय चर्चा करून कराराचे महत्त्वाचे मुद्दे पुढे नेले. (India-EU trade deal)
या बैठकीत मुक्त व्यापार करार (FTA) लवकरात लवकर अंतिम करण्यावर भर देण्यात आला. तसेच सेवाव्यवहारातील तांत्रिक अडथळे दूर करण्याबाबत चर्चा झाली. शाश्वत विकास, आर्थिक सहकार्य आणि परस्पर हितसंबंध यांचा सखोल आढावा घेण्यात आला. द्विपक्षीय संवाद वाढवून सहकार्य आणखी मजबूत करण्याचा तसेच वेळबद्ध आणि परस्पर लाभदायक करारासाठी प्रयत्न अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. (India-EU trade deal)
या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुक्त व्यापार करार वाटाघाटींना धोरणात्मक मार्गदर्शन देणे आणि दोन्ही बाजूंच्या हितसंबंधांना वेग मिळवून देणे हा आहे. भारत–युरोपीय संघ संबंध एका निर्णायक टप्प्यावर असताना ही बैठक व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. (India-EU trade deal)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\