मुंबई : ( Ravish Kumar Singh Named JNPA VP ) आयआरटीएस रवीश कुमार सिंग यांनी भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी करणाऱ्या बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे.
जेएनपीए येथे आगमन झाल्यानंतर, विभागमुख्यांच्या उपस्थितीत जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. जेएनपीएच्या उत्कृष्टता, डिजिटल परिवर्तन आणि भविष्यातील विस्तार या महत्वाच्या भूमिकेत प्रवेश करत असताना सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आयआरटीएस रवीश कुमार सिंग यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी आहे आणि त्यांच्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील विविध आणि वैविध्यपूर्ण व्यावसायिक पार्श्वभूमी आहे. जेएनपीएमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी मध्य रेल्वेचे उपमुख्य ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केले आहे. ही भूमिका ते सप्टेंबर २०२३ पासून सांभाळत होते. दक्षिण पूर्व मध्य आणि मध्य रेल्वेतील त्यांच्या विविध भूमिकांमध्ये त्यांनी भारतातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे झोनमधील प्रमुख ऑपरेशनल धोरणे आणि कार्यक्षमता उपक्रमांचे नेतृत्व केले.
त्यांच्या व्यापक सरकारी अनुभवाव्यतिरिक्त सिंग यांनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) आणि एनटीपीसी लिमिटेड यासारख्या अग्रगण्य खाजगी व सरकारी क्षेत्रातील संस्थांमध्येही योगदान दिले आहे, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत एक मजबूत तांत्रिक आणि उद्योग-केंद्रित दृष्टिकोन विकसित झाला आहे. बहुविध क्षेत्रातील त्यांचा अनुभव, धोरणात्मक दृष्टीकोन आणि परिणामाभिमुख कामाचा पद्धत लक्षात घेता सिंग यांची नियुक्ती जेएनपीएच्या कार्यक्षमता, नवोपक्रम आणि भागीदार-केंद्रित विकासाच्या बांधिलकीला अधिक बळकटी देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.