Female Doctor Suicide Case : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ६० दिवसांत आरोपपत्र सादर करणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सुसाईड नोटवरील अक्षर महिलेचेच

    10-Dec-2025   
Total Views |
 
Female Doctor Suicide Case
 
नागपूर : (Female Doctor Suicide Case) फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी (Female Doctor Suicide Case) राज्य सरकार येत्या ६० दिवसांत न्यायालयात आरोपपत्र सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.(Female Doctor Suicide Case)
 
भाजप आमदार अमित साटम यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंके, ज्योती गायकवाड, सुनील प्रभु, नाना पटोले यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.(Female Doctor Suicide Case)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "फलटण येथील पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याने पीडित महिला डॉक्टराला (Female Doctor Suicide Case) विवाहाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते, हे सिद्ध झाले आहे. त्यानंतर त्याने वेगळी भूमिका घेतल्याचे दिसते. या घटनेच्या ५ महिन्यांपूर्वी, ही महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने ती मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना तंदुरस्त नसल्याचा वैद्यकीय अहवाल देत आहे, असे पत्र वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिले आहे. यातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर यानेही या महिला डॉक्टराची फसवणूक केली आहे. त्यामुळे या महिलेने त्या दोघांचे नाव लिहून आत्महत्या केली आहे. महिलेच्या सुसाईड नोटवरील अक्षर हे त्या महिलेचे असल्याचे समोर आले आहे."(Female Doctor Suicide Case)
 
"लवकरच याप्रकरणाचे आरोपपत्र दाखल होईल. या प्रकरणी महिला डॉक्टरने आरोपींसमवेत केलेले व्हॉट्सअप संभाषण आणि ती राहत असलेल्या खोलीसमोरील सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे तिथे कोण आले, कोण गेले ही सगळी माहिती आहे. काही गोष्टींचा तपास अजूनही होत आहे. याप्रकरणात ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Female Doctor Suicide Case)
 
प्रत्येक गोष्ट लाडकी बहिण योजनेशी जोडू नका
 
यावेळी विरोधकांनी या प्रकरणावरून राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचा आरोप केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सगळ्या गोष्टी लाडकी बहिण योजनेशी जोडणे योग्य नाही. राज्यातील महिलांनी ही योजना स्विकारली असून आम्ही महिला सुरक्षेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू. तसेच काही लोकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण अतिशय पारदर्शी पद्धतीने या प्रकरणाची चौकशी सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.(Female Doctor Suicide Case)
यावेळी आ. प्रकाश सोळंके यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांतील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "पीडित महिला ही कंत्राटी पद्धतीने कामावर होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांतील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही. या घटनेतील महिलेच्या परिवाराला संवेदना म्हणून कायदेशीर मदत करण्याच्या दृष्टीने शासन विचार करेल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.(Female Doctor Suicide Case)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....