नाना पटोले यांची मागणी अध्यक्षांनी फेटाळली

    10-Dec-2025   
Total Views |
Nana Patole
 
नागपूर : ( Nana Patole ) राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे निवेदन काँग्रेस आ. नाना पटोले यांनी विधानसभेत सादर केले होते. परंतू, राज्य विधिमंडळाने राज्याच्या निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करणे संविधानाला अपेक्षित नाही, असे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
 
नाना पटोले म्हणाले की, “अलीकडे राज्य निवडणूक आयुक्तांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूका काही ठिकाणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. निवडणूक प्रक्रिया अधिसुचित झाल्यानंतर निवडणूका पुढे ढकलण्याची कोणतीही तरतूद भारतीय राज्यघटनेत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांची ही कृती घटनात्मक अधिकारांचा अतिरेक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ क मधील तरतूदीनुसार राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
 
हेही वाचा : Government of Maharashtra: २०२६ मध्ये २४ सरकारी सुट्ट्या, महाराष्ट्र सरकारकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर!
 
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, “उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ज्या कारणावरून त्यांच्या पदावरून दूर केले जाते त्याव्यतिरिक्त अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्तांना दूर केले जाणार नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना ज्या कारणाने त्यांच्या पदावरून दूर केले जाते त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयुक्तांनाही दूर करण्याबाबतच्या स्पष्ट तरतूदी आहे. त्यामुळे हा अधिकार केवळ संसदेचा असून राज्य विधिमंडळात राज्याच्या निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया करणार नाही. हे संविधानाला अपेक्षित नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी दिलेल्या निवेदनावर या सभागृहाने अथवा राज्य शासनाने कारवाई करणे अपेक्षित नाही.”
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....