Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट होणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची घोषणा

आ. अमीत साटम यांनी केली मागणी

    10-Dec-2025   
Total Views |
Mumbai Municipal Corporation
 
नागपूर : (Mumbai Municipal Corporation) मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) ‘दत्तक वस्ती’ योजनेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने या योजनेचे संपूर्ण ऑडिट करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ.अमीत साटम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित धरला. (Mumbai Municipal Corporation)
 
आ. अमीत साटम म्हणाले की, "मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांमधील कचरा जमा करून तो डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचवण्यात दत्तक वस्ती योजनेचा खूप मोठा सहभाग असतो. पण झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेत नियमांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या योजनेनुसार १५० कुटुंबे किंवा सुमारे ७५० लोकसंख्येच्या झोपडपट्टी भागासाठी किमान १५ कामगार नेमणे बंधनकारक आहे. परंतू, बहुतांश स्वयंसेवी संस्था केवळ ५ ते १० कामगारच ठेवतात. उरलेल्या कामगारांच्या मानधनाचा अपहार होतो. तसेच झोपडपट्टी भागात दिवसातून दोन वेळा कचरा उचलणे अनिवार्य आहे. मात्र, प्रत्यक्षात ते होत नाही. त्यामुळे रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे दिसतात," असे म्हणाले. (Mumbai Municipal Corporation)
 
हेही वाचा : Indian Citizenship : भारतीय नागरिकत्व घेण्यापूर्वी मतदार यादीत नाव कसे?
 
"यामध्ये मुंबई महापालिकेच्या  (Mumbai Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारीही सामील आहेत. त्यामुळे आवश्यकता असल्यास योजनेचे निकष बदलावे. ७५० लोकसंख्येचा निकष ५०० करण्यात यावा, कामगारांचे मानधन वाढवावे. पण संबंधित भागात पुरेसे कामगार नेमले जायला हवेत,” असे ते म्हणाले. (Mumbai Municipal Corporation)
यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी “मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) दत्तक वस्ती योजनेचे ऑडिट लवकरच करण्यात येईल,” अशी ग्वाही सभागृहात दिली. (Mumbai Municipal Corporation)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....