कल्याण : (The Kalyan Janata Sahakari Bank) दि कल्याण जनता सहकारी बॅंक (The Kalyan Janata Sahakari Bank) लिमिटेड (मल्टीस्टेट शेडय़ुल्ड बॅंक) यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक बैठकीला सीए आणि कर सल्लागार यांच्याकडून चांगला प्रतिसाद लाभला.(The Kalyan Janata Sahakari Bank)
महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी बॅंक म्हणून दि कल्याण जनता सहकारी बॅक (The Kalyan Janata Sahakari Bank) लिमिटेड कडे पाहिले जाते. बॅंकेने कल्याण डोंबिवली परिसरातील चार्टर्ड अकाऊंटटस् आणि कर सल्लागारांना व्यावसायिक बैठकीसाठी आमंत्रित केले होते. त्यामध्ये सुमारे 110 चार्टर्ड अकाउंटंटस् आणि कर सल्लागार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला सीए मुकुंद एम. चितळे, राकेश अग्रवाल, कर व्यावसायिक संघाचे अध्यक्ष गणेश शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय बॅंकेचे संचालक डॉ. रत्नाकर फाटक, हेमंत दरगोडे, शशिकांत आंधळे, संचालिका ॲड संपदा कुळकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष पद्यमनाभ जोशी, संचालक सुरेश पटवर्धन, संचालक मधुसुदन पाटील, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी, बॅकेचे उपाध्यक्ष मंगेश पाटील इ. उपस्थित होते. संचालक मिलिंद नाईक यांनी आभार मानले.(The Kalyan Janata Sahakari Bank)
मुकुंद चितळे यांनी बॅंकेच्या आजवरच्या संचालक मंडळाचे आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, बॅंकेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन नेट प्रॉफिट, नेट एनपीए आणि सीआरएआर (करार) या तीन घटकांद्वारे करता येतो. त्यांनी व्यावसायिक दृष्टीने ‘गोईंग कन्सर्न’ संकल्पना, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, व्यावसायिक प्रामाणिकता आणि व्यावसायिक दृष्टीकोन यावर मार्गदर्शन केले. तसेच व्यावसायिक दृष्टीने काही महत्त्वाचे यशमंत्र दिले.(The Kalyan Janata Sahakari Bank)
मंगेश पाटील यांनी सांगितले, देशातील 1527 नागरी सहकारी बॅकांमध्ये कल्याण जनता सहकारी बॅक 19 व्या क्रमांकावर आहे. विविध आणि आव्हानात्मक बॅकिंग परिस्थितीत बॅकेने सातत्यपूर्ण प्रगती साधली असून ग्राहकांसाठी आधुनिक डिजीटल सेवा सुरू केल्या आहेत. सूक्ष्म उद्योग आणि ग्रामीण भागासाठी ही सातत्यपूर्ण पाठबळ देण्यात बॅक अग्रस्थानी आहे.(The Kalyan Janata Sahakari Bank)
गणेश शेळके यांनी आपल्या भाषणात बॅंक ग्राहकांना समाधानकारक सेवा देते असे नमूद केले आणि बॅंकेच्या पुढील प्रगतीसाठी सूचना मांडल्या. राकेश अग्रवाल यांनी सीए विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच कल्याण डोंबिवली परिसरातील सीएच्या सद्यस्थितीविषयी भाष्य केले.(The Kalyan Janata Sahakari Bank)