अंबुजा सिमेंट्सला पहिल्या इंडो-स्वीडिश CCU प्री-पायलट अभ्यासासाठी निवड

    10-Dec-2025
Total Views |

ACC
अहमदाबाद : अदानी समूहातील अंबुजा सिमेंट्स ही कंपनी जागतिक सिमेंट क्षेत्रात प्रथमच इंडो-स्वीडिश कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (CCU) प्री-पायलट तंत्रज्ञान अभ्यासासाठी निवडली गेली आहे. हा प्रकल्प आयआयटी मुंबई आणि इको टेक (स्वीडन) यांच्या सहकार्याने राबवला जाणार असून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग व स्वीडिश एनर्जी एजन्सी यांच्या इंडस्ट्री ट्रांझिशन पार्टनरशिपअंतर्गत हा अभ्यास प्रायोजित करण्यात आला आहे.
या अभ्यासाद्वारे कठीण मानल्या जाणाऱ्या सिमेंट क्षेत्रातून उत्सर्जित कार्बन डायऑक्साईड शोषणे आणि त्याचा वापर हरित इंधन व विविध सामग्री तयार करण्यासाठी शक्य आहे का, याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. हा उपक्रम पारंपरिक कार्बन स्टोरेज मॉडेलपासून पुढे जात सर्क्युलर कार्बन इकॉनॉमी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
अदानी समूहातील सिमेंट व्यवसायाचे सीईओ विनोद बहेती म्हणाले की, “ही अनुदान-निवड जबाबदार नवकल्पना आणि जागतिक सहकार्याबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेला बळ देते. सीसीयू ही शाश्वत बांधकामाच्या नव्या युगाची सुरुवात आहे आणि आयआयटी मुंबई व स्वीडनच्या इको टेकसहची भागीदारी भविष्यातील विकसात्मक उपायांना चालना देईल.”
अभ्यासात कार्बनडायॉक्साईड पकडण्याची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे. पकडलेले कार्बनडायॉक्साईड कॅल्शियम कार्बोनेटसारख्या सामग्रीत रूपांतरित करणे किंवा ग्रीन मेथेनॉल तयार करण्यासाठी वापरण्याची शक्यता तपासली जाईल. आयआयटी मुंबईचे कार्बनडायॉक्साईड कॅप्चर, मिनरलायझेशन आणि स्टोरेजमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून इको टेक ऊर्जा वापर अनुकूल करणे, वेस्ट हीट रिकव्हरी आणि नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण यात योगदान देणार आहे.
अंबुजा सिमेंट्सची नेट-झिरो उद्दिष्टे एसबीटीआय मान्यताप्राप्त आहेत. कंपनी ग्रीन पॉवर इलेक्ट्रीक किल्न कूलब्रूक आरडीएच तंत्रज्ञान, वन गीगावॉट सौर-पवन क्षमता, 376 मेगावॉट वेस्ट हीट रिकव्हरी प्रकल्प आणि एआय आधारित संचालनाद्वारे कार्बन कमी करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. प्लास्टिक-नेगेटिव्ह आणि वॉटर-पॉझिटिव्ह कामगिरीसह कंपनी शाश्वततेत पुढे असल्याचे मानले जाते.