मुंबई : (Amazon) मायक्रोसॉफ्टनंतर आता अमेझॉननेही भारतात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. नवी दिल्लीतील सहाव्या Amazon Smbhav Summit 2025 मध्ये कंपनीने २०३० पर्यंत सर्व व्यवसायांमध्ये ३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली. ही गुंतवणूक आधीच्या सुमारे ४० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवर आधारित असून, भारतातील डिजिटल आणि आर्थिक वाढीला पुढील गती देणार आहे. (Amazon)
कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित ॲमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली. विकसित भारताच्या उद्दिष्टांशी ॲमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचे सांगून ते म्हणाले की, "या गुंतवणुकीतून १० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात क्षमतावाढ, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधाविकास , रोजगारनिर्मिती आणि लहान उद्योगांना पाठिंबा ही या गुंतवणुकीची उद्दिष्टे असतील." (Amazon)
अमेझॉनची आगामी गुंतवणूक तीन प्रमुख स्तंभांवर केंद्रित असेल. एआय आधारित डिजिटायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मिती. कंपनीने सांगितले की, भारतातील त्यांच्या एकत्रित गुंतवणुकीमुळे ते देशातील सर्वात मोठे परदेशी गुंतवणूकदार, सर्वात मोठे ई-कॉमर्स निर्यातदार आणि अव्वल रोजगारनिर्माते बनले आहेत. या निर्णयामुळे भारतीय तंत्रज्ञान, स्टार्टअप, लॉजिस्टिक्स आणि रोजगार क्षेत्रात मोठ्या सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Amazon)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\