Local Body Elections : १६ जिल्ह्यांतील नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द

    01-Dec-2025   
Total Views |
(Local Body Elections)
 
मुंबई : (Local Body Elections) नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या (Local Body Elections) सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे.(Local Body Elections)
 
हेही वाचा :Local Body Elections : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी  
 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी (Local Body Elections) २ डिसेंबर २०२५ रोजी १६ जिल्ह्यांतील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, पुणे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूर जिल्ह्यातील अनगर, मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, नांदेड जिल्ह्यातील मुखेड, धर्माबाद, लातूर जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसूर्जी, अकोल्यातील बाळापूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, देऊळगावराजा, वर्धा (देवळी) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस यांचा समावेश आहे, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.(Local Body Elections)
  

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....