Mangalprabhat Lodha : परदेशी सल्लागार कंपन्यांकडून लाखो कोटींची लूट

मंत्री मंगलप्रभात लोढा; विकसित भारताच्या संकल्पनेत देशी कंपन्यांना संधी मिळावी

    01-Dec-2025   
Total Views |
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : (Mangalprabhat Lodha) भारतीयांचे हित टाळून परदेशी सल्लागार कंपन्यांकडून लाखो कोटींची लूट होताना दिसते. त्यामुळे विकसित भारताच्या संकल्पनेत देशी कंपन्यांना संधी मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले.
 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वांद्रे, येथे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड गव्हर्नन्स आयोजित ‘नगरी’–द फ्युचर ऑफ सिटीज या परिसंवादाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. विकसित भारताच्या शहरांचे नियोजन या दृष्टीकोनातून या परिसंवादात भविष्यातील पायाभूत सुविधा या विषयावर राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनीही व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे मार्गदर्शन केले. या परिसंवादाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी चौहान उपस्थित होते.(Mangalprabhat Lodha)
 
हेही वाचा : Virata Ramayana Temple : विश्वातील सर्वात भव्य शिवलिंगाचे 'विराट रामायण' मंदिराच्या दिशेने प्रस्थान  
मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) म्हणाले की, "विविध विभागात विकासात्मक उपक्रम राबवण्यासाठी सध्या परदेशी कंपन्यांना केवळ सल्ल्यापोटी लाखो कोटी रुपये दिले जातात. त्या बहुराष्ट्रीय कंपन्या गब्बर फायदा कमवून कर त्यांच्या देशात भरतात. आकड्यात सांगायचे झाल्यास सुमारे एक लाख कोटींपेक्षा जास्त या कंपन्यांवर खर्च होत आहे. या कंपन्यांना झालेल्या भरमसाठ फायद्यातून या कंपन्या त्यांच्या देशात कर भरतात. तर त्यांच्यासाठी काम केलेल्या भारतीयांना केवळ तुजपूंजी रक्कम देतात. भारतीयांच्याच कौशल्याचा वापर करून त्या कंपन्या गडगंज होत आहेत. या परिस्थितीत भारतीय विचारांच्या स्वदेशी कंपन्यांना अधिक बळ देण्याची वेळ आली आहे. हे चित्र आता बदलण्याची आवश्यकता असून विकसित देशाच्या संकल्पनेत भारतीय विचारांच्या कंपन्यांना संधी मिळाली पाहिजे," असे ते म्हणाले.(Mangalprabhat Lodha)
 
मालाड-मालवणी भागात बांग्लादेशी-रोहिग्यांची घुसखोरी
 
"केवळ मोठे रस्ते, मोठ्या इमारती आणि वाहतूक व्यवस्था म्हणजे विकसित शहरांची संकल्पना नाही तर, भौतिक सुविधांबरोबरच आपल्या संस्कृतीची सांगड घातली गेली पाहिजे. मुंबईतल्या मालाड मालवणी भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी आहे. कोणत्याही शहराच्या सुरक्षेसाठी हे योग्य नाही. भविष्यात घुसखोरी रोखण्यासाठीही परिणामकारक यंत्रणा असणे अत्यावश्यक झाले आहे," असेही ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम हातात आपला देश असून लवकरच आपण विकसित राष्ट्राच्या अग्रणी भागात असू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Mangalprabhat Lodha)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....