नुकतेच खारघर येथून १०२ लोकांना पोलिसांनी अटक केली. ते बांगलादेशी असून, त्यांनी भारतात घुसखोरी केली असा पोलिसांचा दावा आहे. यामध्ये ७० महिला असून, त्या खारघरच्या सोसायट्यांमध्ये घरकाम करतात. या सगळ्या जणींच्या कागदपत्रात त्यांचे मूळ निवासस्थान पश्चिम बंगाल आहे. किती भयंकर आहे; पण असे जरी असले, तरीसुद्धा नवी मुंबईमधील जागरूक हिंदूंचेही अभिनंदन. कारण, ते त्यांच्यापरीने धर्मांध शक्तींशी सामना करत असतात. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये नक्की काय सुरू आहे, याचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
बांगलादेशातून घुसखोरी केलेल्या त्या ७० महिला खारघरमधील रहिवाशांच्या घरांपर्यंत, अगदी स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या. त्यांच्या घरातील खडा न् खडा तपशील त्यांच्याकडे असणार. घरात कितीजण आहेत? ते काय करतात?घराची आर्थिक-सामाजिक स्थिती कशी आहे, हे सगळे या महिलांना माहिती असणार. उद्या घातपात करायचा ठरवले किंवा घरातील मुलीबाळींना किंवा मुलांनाही चिथवायचे, फितवायचे किंवा वाईट वळणाला लावायचे ठरवले असते, तर या महिलांचा वापर करणे धर्मांधांना सहजशक्य होते. चोरी, दरोडे, अपहरण, खून; इतकेच काय, राहत्या निवासस्थानी आत्मघातकी हल्ले करण्यासाठी या माहितीचा वापर कशावरून होणार नसेल?
मुळात आपल्या घरात दोन-चार तास का होईना; पण राहणारी व्यक्ती कोण आहेत याबाबत पूर्ण माहिती घ्यावी, असे त्यांना घरकामाला ठेवणार्या लोकांना का वाटले नाही? स्थानिक घरकाम करणार्या महिलांपेक्षा कमी पैसे घेतात म्हणून त्यांना कामाला ठेवताना, या लोकांनी स्वतःची आणि घरच्यांची सुरक्षितता धोक्यात घातली. घरात भाडोत्री म्हणून राहणारे, तसेच घरकाम करणारे, इतर काम करणार्यांची तपशीलवार माहिती घ्या, स्थानिक पोलीस स्थानकात त्यांची नोंद करा, असे पोलीस प्रशासन सातत्याने सांगते. मात्र, त्यावर मुंबईकर आणि नवी मुंबईकर हिंदू किती लक्ष देतात?
त्याची किती अंमलबजावणी करतात? कष्ट करणे हा गुन्हा नाही. देशातील स्थानिक कष्टकर्यांचा आदरच आहे. मात्र, आता असे आढळून आले आहे की, कपड्यांची दुकाने, कॅटरिंग, फूड स्टॉलवर काम करणार्यांमध्ये वय वर्षे १४ ते ३० वर्षांपर्यंतचे पुरुष मोठ्या प्रमाणात असतात. बहुतेकदा ते स्थानिक नसतात आणि हिंदूही नसतातच. दिवसा काम करतात आणि रात्री कामाच्या ठिकाणीच राहणात किंवा आठ-दहा लोक एक खोली भाड्याने घेऊन राहतात. हे लोक शहरात कुठून येतात? त्यांची पार्श्वभूमी काय? याबद्दल कोणालाही माहिती नसते. मग, पोलिसांकडून यांच्या कागदपत्रांची सत्यता तपासणे तर दूरच! या सगळ्यामुळेच की काय, नवी मुंबईमध्ये ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’सोबतच ‘पार्लर जिहाद’ आणि ‘जिम जिहाद’च्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये धार्मिक उन्मादही वाढलेला दिसतो.
त्यामुळेच की काय, ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ने नवी मुंबई धगधगू लागली. याच नवी मुंबईमध्ये यशश्री शिंदे या २० वर्षांच्या मुलीच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने हल्ला करून दाऊद शेख या नराधमाने तिची हत्या केली होती. कारण काय, तर तिने त्याच्यासोबत पळून जायला नकार दिला. निजाम अलीने पूनम क्षीरसागरचा खून करून, याच नवी मुंबईच्या उरण येथे तिचा मृतदेह फेकला होता. निजाम अलीला मदत करणारा सोहेल खान हा उरणमध्येच राहायचा. अशीच एक नवी मुंबईची घटना एका युवतीने ‘एमबीए’पर्यंत शिक्षण घेतले होते, ती आर्थिकदृष्ट्या संपन्न होती आणि तिचा स्वतःचा उद्योग होता.
तिच्या परिसरात एक युनिसेक्स पार्लर सुरू झाले. केसरचना करण्यासाठी ती त्या पार्लरमध्ये गेली. तिथल्या केशकर्तनकाराने अतिशय सभ्य, मधाळ, तितक्याच नम्रतेने तिचे स्वागत केले. तिने त्याचे नाव विचारले, त्याने सांगितले ‘अज्जू’. हळूहळू त्यांची मैत्री झाली. खूप पुढे गेल्यावर तिला कळाले की, अज्जू म्हणजे ‘अजय’ नाही, तर अज्जू म्हणजे ‘अजमल’. त्याने फसवून तिचे धर्मांतरण करून निकाह केला. तिने विरोध केला, तर तिच्यावर अत्याचार सुरू केले. त्यानंतर काही दिवसांनी त्याचे दोन भाऊ अपसर आणि शानू आणि एक मित्र मकसूद या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, आणि हे नेहमीचे झाले. शेवटी कशीबशी तिने सुटका केली. ती पोलिसांत गेली. पण, या घटना वाढतच आहेत.
दुसरीकडे नवी मुंबईमध्ये हिंदूंच्या आस्थांना डिवचण्याचे प्रकार वाढत गेले. खारघरमध्ये ‘इज्तेमा’च्या नावाखाली तीन लाख लोक जमले आणि तिथे एका हिंदू युवकाची हत्या झाली, तर सीबीडी बेलापूरच्या ‘गुड लक मटण शॉप’मध्ये ‘राम’ नाव लिहिलेले बोकड ‘कुर्बानी’साठी विक्रीला ठेवले होते. त्या दुकानावर ‘प्रोप्रायटर’ म्हणून ‘मोहम्मद शफी’ नाव लिहिलेले होते. त्यांना हा संदेश द्यायचा होता का की, ते रामाची कत्तल करत आहेत? या सगळ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
दुसरी घटना नवी मुंबईच्या परिसरातीलच. सोसायटीमध्ये हिंदू-मुस्लीम दोन्ही समुदायाचे लोक राहतात. बकरी ईदला सोसायटीमधील मुस्लिमांनी बकर्यांना कुर्बानीसाठी आणले. मात्र, सोसायटीने निर्णय दिला की, सोसायटीच्या आवारामध्ये बकर्यांची कुर्बानी करता येणार नाही. त्यानंतर दिवाळी आली. हिंदू महिलांनी सोसायटीच्या आवारात दीप उजळवले, रांगोळी काढण्याची तयार केली. तर त्यांना सोसायटीतील मुस्लीम कुटुंबांनी मज्जाव केला. "आम्ही ‘बकरी ईद’ला इथे बकरे कापले नाही, तर तुम्हीपण इथे दिवाळी साजरी करायची नाही.” त्या हिंदू महिलांना शिवीगाळ केली गेली, धमकावले गेले. प्रकरण खूप तापले होते. कुठून येते ही अशी हिंमत? आपण हिंदूंना आणि त्यांच्या श्रद्धांना पायदळी तुडवू शकतो, आपले कोणी काही वाकडे करणार नाही, अशी यांची धारणा!
गेल्यावर्षी नवी मुंबईहून मंजू शर्मा नावाच्या महिलेला पोलिसांनी पकडले. कारण, मंजू शर्मा ही बांगलादेशातून घुसखोरी केलेली अल्ताफ शेख होती. काही वर्षांपूर्वी ती घुसखोरी करत प. बंगालमध्ये गेली. तिथे दलालांमार्फत खोटी कागदपत्रे बनवली आणि तडक तिने नवी मुंबई गाठली. काही दिवसांतच तिने पुरुषोत्तम शर्मा नावाच्या पुरुषाशी ओळख करून घेतली. त्याच्याशी विवाह करून ती राजरोसपणे मंजू शर्मा झाली. अशाप्रकारे अल्ताफ शेख ही एकटीच असेल का? तर तसे नाही. बांगलादेशी मुसलमान नवी मुंबईमध्ये घुसखोरी करतात. इथे आल्यावर काय करायचे हे ठरलेले असते. पीडित आहोत, गरीब आहोत असे दाखवत नोकरी, मजदूरीचे काम करण्याच्या निमित्ताने हिंदू वस्त्यांशी संपर्क वाढवायचा.
अनेकवेळा असे दिसून आले आहे की, या घुसखोरी केलेल्यांमधले पुरुष हिंदू स्त्रीला आणि स्त्री हिंदू पुरुषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याशी विवाह/निकाह करून भारतीय म्हणून राहतात; पण भारतात राहिले तरी त्यांची निष्ठा बांगलादेश, पाकिस्तान आणि सौदी, पॅलेस्टाईनच्या चरणी वाहिलेली. कट्टर धर्मांधता त्यांच्यातून कधीच जात नाही. काही वर्षांत इथे बस्तान बसल्यावर त्यांचे कारनामे सुरू होतात. ते जिथे राहतात तो परिसर हिंदुबहुल आहे, तो कसा मुस्लीमबहुल होईल, यासाठी ते प्रयत्न करतात. त्यासाठी अर्थातच, स्थानिक समाजविघातक लोकांची साथ असणारच. काही राजकीय पक्ष या लोकांना ‘व्होटबँक’ म्हणूनच पाहतात. परिसर मुस्लीमबहुल झाला की, त्यांच्या मतांवर सत्तेत यायचे, हे स्वप्न ते पाहत असतात; पण त्यांच्या सत्तास्वार्थामुळे देशाचे, समाजाचे अनन्वित नुकसान होते, याचे त्यांना सोयरसुतक नसते.
असो. पण, या सगळ्या पार्श्वभूमीवरही नवी मुंबई, हा महाराष्ट्र, हा देश अजूनही सुरक्षित आहे, याचे श्रेय जागरूक असलेल्या हिंदूंना द्यायला हवे. नवी मुंबईमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते, पदाधिकारीच नव्हे, तर सर्वसामान्य हिंदूही आता जागृत आहेत. जरा कुठे वावगे, शंका घेण्यासारखे दिसले, तर लोक सतर्क होतात. कायदा-सुव्यवस्थेची मदत घेतात. अनेक ठिकाणी तर अनोळखी लोकांना भाडोत्री म्हणून ठेवण्यास, कामावर ठेवण्यास नकारच दिला जात आहे. तसेच, हिंदू धर्म, श्रद्धा, संस्कार, संस्कृती यासंबंधी कार्य सुरू आहे. नवी मुंबईमध्ये धर्मांधांनी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांच्या विघातक कारवाया उघड होतातच. त्यामुळे नवी मुंबईला धर्मांधतेचा अड्डा बनवायचा, हे स्वप्न पाहणार्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होत नाहीत. ‘हिंदू सारा एक हैं’ या जाणिवेची शलाका नवी मुंबईमध्ये दीप्तिमान झाली आहे, त्या ज्वालेत धर्मांध समाजविघातकांचा नाश अटळ आहे!