मुंबई : (Ashish Shelar) भाजप आणि आमचे कार्यकर्ते बेकायदेशीर कामांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. त्यामुळे ज्यांना बेकायदेशीर कृत्यांच्या कारवाईवर अडचण निर्माण होते ते असे धमकी सत्र करत असून पोलिस त्यांचा बिमोड करतील, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.
आ. संजय उपाध्याय यांना आलेले धमकीचे पत्र आणि भाजपचे सरचिटणीस गणेश खणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्या दोघांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "जो प्रामाणिकतेने जनहितार्थ काम करतोय, त्याला प्रामाणिक आणि जनहितार्थ रस्त्यापासून भटकवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर सरकार त्याला सोडणार नाही. या विषयात मी पोलिस आयुक्तांशी बोलत आहे. अशा लोकांना सरकार आणि पोलिस धडा शिकवेल. संजय उपाध्याय यांना आलेली धमकी आणि धमकीचे पत्र या विषयामध्ये सरकार गंभीर आहे. पोलीस कारवाई करतील, मी पाठपुरावा करेन."(Ashish Shelar)
"प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा नाहीये, ती मजबूत आहे. मुख्यमंत्री, पोलीस, सरकार काम योग्य करत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसून हा बेकायदेशीर काम करणाऱ्यांच्या विरोधातल्या संघर्षाचा मुद्दा आहे आणि ते व्रत आम्ही घेतलेले आहे. भाजपचे कार्यकर्ते किंवा संजय उपाध्याय हे बेकायदेशीर गोष्टी मोडत आहेत. गणेश खणकर हेसुद्धा टँकरमाफियांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. मंगलप्रभात लोढाजी सरकारच्या सार्वजनिक जागा सुरक्षित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. आम्ही मुंबईचे पहारेकरी आहोत. त्यामुळे ज्यांना बेकायदेशीर कृत्यांच्या कारवाईवर अडचण निर्माण होते ते असे धमकी सत्र करत असून पोलिस त्यांचा बिमोड करतील," असे ते म्हणाले.(Ashish Shelar)
"टँकर माफियांबरोबर उभ्या राहणाऱ्या उबाठा सेनेच्या दलालांविरोधात आमचा गणेश खणकर आणि भारतीय जनता पक्ष लढतो आहे. त्यामुळे हा भ्याड हल्ला झाला आहे. पण यातून मुंबईकरांसाठी लढण्याची प्रेरणा आणि मुंबईकरांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. उबाठा सेनावाल्यांनी मुंबईमधला नाल्यातला कचरा खाल्ला. रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये पैसा खाल्ला. आता लोकांना पाण्याच्या माफियांबरोबर त्रास देत आहेत आणि पाणी माफियांचे हे दलाली करणारे उबाठा सेनेचे लोक आहेत. त्यांच्या विरोधातला संघर्ष अजून तीव्र करू. पोलीस तर कारवाई करतील, पण आम्ही जनआंदोलन करू," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.(Ashish Shelar)
"मंगल प्रभात लोढाजींची तक्रार स्वयंस्पष्ट आहे. त्यांच्या तक्रारीतच त्यांनी म्हटले की, मला जे शब्द वापरले गेले, ज्या व्यक्तीने, ज्या विरोधकाने वापरले, हे प्रचंड गंभीर आहेत. अमित साटमजींच्या विषयामध्ये जो व्हिडिओ आणि ज्या पद्धतीचे वक्तव्य केले ते तळपायाची आग मस्तकात शिरण्यासारखे त्या व्यक्तीने केलेले आहे, या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे," असेही मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले.(Ashish Shelar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....