Al-Falah : 'अल-फलाह'च्या कुलगुरुंचा नवा कारनामा! बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्या मृत हिंदूंच्या जमिनी

ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस

    29-Nov-2025   
Total Views |
Al-Falah
 
मुंबई : (Al-Falah) दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जवाद अहमद सिद्दीकी यांच्याविषयी एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जवाद अहमद सिद्दीकी यांनी अनेक वर्षांपूर्वी मृत झालेल्या हिंदू मालकांच्या जमिनी बनावट कागदपत्रे तयार करून हडप केल्याचा दावा ईडीने केला आहे. जवाद अहमद सिद्दीकी हे फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. (Al-Falah)
 
ईडीच्या तपासात उघड झाले की, दिल्लीच्या मदनपूर खादर भागातील काही जमिनी हिंदू मालकांच्या नावावर होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर बनावट दस्तावेज तयार करून त्या जमिनी जवाद सिद्दीकी तथा त्यांच्या संस्थांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्या. फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाचे नाव आधीच दिल्ली कार स्फोट प्रकरणात उघड झालेल्या आतंकी मॉड्युलशी जोडले गेले आहे. या विद्यापीठातील तीन डॉक्टरांना या कटप्रकरणात अटक झाली होती. (Al-Falah)
 
हेही वाचा :Shirish Kanekar : एनसीपीएमध्ये रंगला कणेकरांच्या शब्दसृष्टीचा प्रवास   
 
ईडीचे असे म्हणणे आहे की, खसरा क्रमांक ७९२ ची जमीन सिद्दीकी यांच्याशी संबंधित ‘तरबिया एज्युकेशन फाउंडेशन’ या ट्रस्टच्या नावावर एका बनावट जनरल पॉवर ऑफ अटर्नी (जीपीए)च्या आधारे हस्तांतरित करण्यात आली. ज्या जमिनींचे मूळ मालक म्हणून ज्यांची नावे होती, त्यातील अनेकांचा मृत्यू १९७२ ते १९९८ दरम्यान झाला होता. तरीही, त्यांच्या नावावर दि.७ जानेवारी २००४ रोजीची तारीख टाकून जीपीए तयार करण्यात आला आणि त्यावर त्या मृत व्यक्तींचे हस्ताक्षर किंवा अंगठ्याचे ठसे असल्याचे दाखवले गेले. नंतर ही जमीन पुन्हा नोंदणी करून घेतली गेली. (Al-Falah)
 
जीपीए म्हणजे काय?
 
जनरल पॉवर ऑफ अटर्नी (जीपीए) हा असा कायदेशीर दस्तावेज आहे, ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मालमत्तेशी संबंधित निर्णय, आर्थिक व्यवहार, कायदेशीर प्रतिनिधित्व यांसारख्या मोठ्या बाबींमध्ये स्वतःच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार देतो. (Al-Falah)
 
एनआयएने देखील तपासादरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील दहशतवादी डॉ. शाहीन सईदच्या लॉकरमधून उर्दू दस्तऐवज, रोख रक्कम आणि पेन ड्राइव्हसह इतर सामान तपास यंत्रणेला मिळाले आहे. हे सर्व साहित्य अल-फलाह विद्यापीठाच्या (Al-Falah) धौज गाव कँपसमधून मिळाले. तपास पथकाने अल-फलाह विद्यापीठात झडती घेतल्यानंतर हे समोर आले. (Al-Falah)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक