कलेची अविरत सेवा करणार्या कलावंतांचा सरकारकडून सन्मान
29-Nov-2025
Total Views |
मुंबई : ( Maharashtra State Cultural Awards 2025 ) कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ काळ सेवा दिलेल्या कलावंतांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी, भारुड/विधिनाट्य, वाद्यनिर्मिती, झाडीपट्टी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मीळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनितंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हॉईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली.
या पुरस्काराचे स्वरुप ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख, युवा पुरस्कार एक लाख मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे असणार आहे. अभिनेते अरुण कदम यांना नाटकासाठी तर लेखक-निवेदक अंबरीश मिश्र आणि उदय सबनीस यांना निवेदनासाठी तसेच अन्य कलाकारांना वेगवेगळ्या विभागामध्ये हा पुरस्कार ज्येष्ठ या श्रेणीमध्ये देण्यात येणार आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान, मधुरा वेलणकर, प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांना युवा श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा लवकरच संपन्न होईल, अशी माहिती सांस्कृतिक विभागाकडून देण्यात आली आहे.
ज्येष्ठ पुरस्कार
नाटक : अरुण कदम (२०२५), कंठसंगीत : धनंजय जोशी (२०२५), वाद्यसंगीत : विजय चव्हाण (२०२५), मराठी चित्रपट : शिवाजी लोटन पाटील (२०२५), उपशास्त्रीय संगीत : उदय भवाळकर (२०२५), कीर्तन/समाजप्रबोधन : गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (२०२५), तमाशा : कोंडीराम आवळे (२०२५), शाहिरी : शाहीर मधुकर मोरे (२०२५), नृत्य : रंजना फडके (२०२५), लोककला : हरिभाऊ वेरुळकर (२०२५), आदिवासी गिरीजन : रायसिंग हिरा पाडवी (२०२५), कलादान : चंद्रकांत घरोटे (२०२५), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक-पत्रकार- प्रा. आनंद गिरी (२०२४), संजीव भागवत (२०२५), लोकनृत्य : सुभाष नकाशे (२०२४), अरविंद राजपूत (२०२५), लावणी संगीतबारी : शकुंतला नगरकर (२०२४), कल्पना जावळीकर (२०२५), भारुड/विधिनाट्य/गौळण : पद्मजा कुलकर्णी (२०२४), गोदावरी मुंडे (२०२५), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार : युसुफ घडूलाल मूल्ला (२०२४), भालेराव नागोराव दडांजे (२०२५), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत : रामदास चौधरी (२०२४), बुधा भलावी (२०२५), दशावतार/नमन खेळ/वहीगायन : ओमप्रकाश यशवंत चव्हाण (२०२४), भानुदास शंभा सावंत (२०२५), दुर्मीळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणार्या व्यक्ती/संस्था : धर्मा कांबळे (२०२४), साखराबाई टेकाळे (२०२५), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट (२०२५), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (२०२४), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार - अविनाश ओक (२०२४), महेश अंबेरकर (२०२५), संगीत संयोजन : अमर हळदीपूर (२०२४), कमलेश भडकमकर (२०२५), व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन : अंबरीश मिश्र (२०२४), उदय सबनीस (२०२५)