Local Body Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबरला रात्री १० पर्यंत प्रचार करता येणार

    29-Nov-2025   
Total Views |

(Local Body Elections)
 
मुंबई : (Local Body Elections) नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे पत्रक काढून हा निर्णय घेतला.(Local Body Elections)
 
नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Local Body Elections) २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहेत. त्यासाठी जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० पर्यंत करण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.(Local Body Elections)
 
हेही वाचा : Cyclone Ditwah : श्रीलंकेत वादळ दिटवाहमुळे झालेल्या मुसळधार पावसात १२३ जणांचा मृत्यू, तर अनेक जण अजूनही बेपत्ता  
 
रात्री १० पासून प्रचारावर बंदी
 
यानुसार, मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.(Local Body Elections)
 
२ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी
 
राज्य सरकारने २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी संबंधित क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी शुल्क सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.(Local Body Elections)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....