मुंबई : (Bhagavad Gita) भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता (Bhagavad Gita) आम्हाला निःस्वार्थ भावनेने लोककल्याणासाठी काम करा ही शिकवण देते. भगवद्गीतेतील (Bhagavad Gita) मूल्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मार्गदर्शन करत असतात, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील उडुपीच्या श्री कृष्ण मठात आयोजित केलेल्या 'लक्ष कंठ गीता पारायण' या भव्य धार्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम श्रीमद भगवद्गीतेच्या ५,००० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. (Bhagavad Gita)
मानवी कचरा हाताने वाहून नेण्याची अमानवी प्रथा संपवण्याच्या पूर्वीच्या नगरपालिकेच्या पथदर्शी निर्णयाची आठवण करून देत, राष्ट्रीय स्वच्छ भारत चळवळीला प्रेरणा देण्याच्या उडुपीच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. २०४७ पर्यंतच्या काळाकडे केवळ अमृत काळ म्हणून नव्हे तर कर्तव्य काळ म्हणूनही पाहिले पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेने विकसित भारताच्या उभारणीसाठी योगदान दिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. नारी शक्ती, आयुष्मान भारत आणि पंतप्रधान आवास योजना यासारख्या योजना भगवद्गीतेच्या मूल्यांमधून प्रेरणा घेऊन आणल्या आहेत, असेही मोदी म्हणाले. (Bhagavad Gita)
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत १ लाखांहून अधिक भाविकांनी भगवद्गीतेच्या (Bhagavad Gita) १५ व्या अध्यायाचे सामूहिक आणि अत्यंत उत्साही वातावरणात पठण केले. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००८ मध्ये श्री कृष्ण मठाला शेवटची भेट दिली होती. (Bhagavad Gita)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.