मोठ्या गप्पा मारणारे युवराज आज वरळीत दिसले नाहीत- अमीत साटम
28-Nov-2025
Total Views |
मुंबई : ( Ameet Satam ) " भारत जोडो करणारे लोक आज कुठे दिसले नाहीत.मोठ्या गप्पा करणारे युवराज आज वरळीत दिसले नाहीत.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालताना पण दिसले नाहीत.यातून यांचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा दिसून येतो. बीएमसी हा कौटुंबिक व्यवसाय नाही. त्यामुळे कोण कुणाच्या घरी जाते. जागा वाटप बाबत काय चर्चा करते यापेक्षा मुंबईच्या विकासाचे प्रकल्प महत्वाचे आहेत."असे परखड मत भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी ठाकरे बंधू आणि आदित्य ठाकरे यांच्यावर शुक्रवार दि.२८ रोजी एन एस सी आय क्लब,वरळी, मुंबई येथे व्यक्त केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित युनिटी रन फ्लॅग ऑफ सेरेमनी निमित्त ते बोलत होते.
"मोहसीन खान हा तोतया व्यक्ती मुंबई काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. ज्याची चार वेगळी नावे अन् कागदपत्रे आहेत.दोन वेगळे जन्मदाखले आहेत. ज्यावर फसवणुकीची एफ आय आर नोंद आहे.अशा खानापासून मुंबईला रोखायच आहे. आणि अशा खानापासून सर्वांना एकत्रित सुरक्षित ठेवायचं आहे." अशी टीका साटम यांनी मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मोहसीन खान यांच्या प्रश्नावर केली.
"ज्यांची मुले बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली. ज्यांच्या मुलांनी कॉलेज मध्ये जर्मन आणि फ्रेंच भाषा निवडली ते आम्हाला आता मराठी शिकवत आहेत. मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो.सोन्याचा चमचा घेऊन जे जन्माला आले त्यांच्याकडून मराठी शिकायची मला गरज नाही.माझ्या वडिलांनी पेपर टाकून स्वतः शिकून नोकरी करून आम्हाला मोठ केलं."अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
"ज्यांच्या पेपरचा खप वाढवायचा आहे म्हणून काहीही बातम्या दिल्या जातात. मुंबई शहरात डीप क्लिनिंग ड्राईव्ह करून धुळीवर मात केली पाहिजे. ज्याठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत.ते सर्व प्रोटोकॉल फॉलो करतात की नाही याच ऑडिट झालं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर बाबतचे नियम पाळले गेले तर मुंबईतील धुळीचा प्रश्न सुटेल. राज्य निवडणूक आयोग नियमाच्या अधीन राहून निर्णय घेत असते त्याचे स्वागत आहे."असेही सामनासह विविध प्रश्नावर त्यांनी मत मांडले.
"स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ही कार्यकर्त्यांची असते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वच पक्ष कार्यकर्ते लढण्यास इच्छुक असतात. त्यातून काही टीका टिपणी होत असते. निवडणुकीनंतर हा विषय संपेल.महायुती ही एकसंध आहे. तसेच कुमार केतकर यांच्या विधानाकडे लक्ष द्याव असे मला वाटत नाही." असेही साटम म्हणाले.