Dr. Babasaheb Ambedkar : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण” – मुख्यमंत्री फडणवीस

    27-Nov-2025
Total Views |
Dr. Babasaheb Ambedkar
 
मुंबई : (Dr. Babasaheb Ambedkar) महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला दिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे संविधान दिनानिमित्त अनावरण करण्यात आले. पॅरिसमधील युनेस्को मुख्यालय प्रांगणात दिमाखात उभा केलेला हा पुतळा डॉ. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या कर्तृत्वाचे जागतिक स्तरावर मान्यता देणारा ठरला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी विद्वत्ता आणि प्रतिभेच्या जोरावर जगाला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या महान कर्तृत्वाचे प्रतिफळ आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण हे भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे." (Dr. Babasaheb Ambedkar)
 
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘अँक्शन प्लॅन’, बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश !
 
अनावरण सोहळा युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रसंगी युनोस्कोचे अधिकारी व संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीसह या प्रयत्नशील सर्वांचे अभिनंदन केले. (Dr. Babasaheb Ambedkar)
 
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा पुतळा उभा राहणे हा केवळ एक भौतिक स्मारक नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनातील मूल्ये, समता आणि सामाजिक न्याय यांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारा संदेश आहे.