ठाणे : (Balkumar Kavitasangrah) इंटरनेटच्या माध्यमातून विविध ॲपचा प्रभाव असलेल्या डिजिटल युगात माणसे शब्दांपासून दूर दूर जाताहेत अशावेळी शब्दांचे हे आनंदी विभ्रम घेऊन मुलांना खेळते आणि बोलते करण्यासाठी मोहन काळे यांची कविता मराठी साहित्यात मोलाची भर घालते, असे प्रतिपादन कविवर्य अरुण म्हात्रे यांनी बालदिनी मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे पार पडलेल्या "चला, पुन्हा शाळेत जाऊ या" ह्या बालकुमार कवितासंग्रहाच्या (Balkumar Kavitasangrah) प्रकाशानावेळी काढले.
ग्रंथाली प्रकाशनाने एक वाचक चळवळ म्हणून मोलाचे काम केले असून त्यांनी जेव्हा कवितासंग्रह प्रकाशित (Balkumar Kavitasangrah) करण्याचे ठरवले तेव्हापासून महाराष्ट्रातील कवींना हक्काचे व्यासपीठ मिळाले, असे कविवर्य अरुण म्हात्रे यावेळी म्हणाले.
ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी बाल वाचक चळवळीचे महत्व अधोरेखित केले. प्रसंगी कवी संदेश ढगे यांनी मोहन काळे हे भाबडे मित्र आहेत म्हणूनच ते प्रामाणिक आहेत. आधीच्या पुस्तकांप्रमाणे या पुस्तकाचेही विक्रमी स्वागत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.(Balkumar Kavitasangrah)
व्यासपीठावरील उपस्थित प्रसाद कुलकर्णी यांनी बालवाचकांसाठी लिहिणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे आणि मोहन काळे यांनी ती लिलया पेलली आहे असे कौतुक केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी अशा पुस्तकातूनच वाचक चळवळ फोफावेल असा आशावाद व्यक्त केला. आपल्या मनोगतात मोहन काळे यांनी त्यांच्या काव्य लेखनाचा प्रवास विषद केला आणि बालकांसाठी काही ठोस करता येईल एवढी शक्ती आणि ऊर्जा लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.(Balkumar Kavitasangrah)
या कार्यक्रमात पुस्तकात सुरेख चित्रे रेखाटणारे पुंडलिक वझे आणि संग्रहाच्या शंभर प्रती घेऊन बालवाचकांसाठी वाचक चळवळ पुढे नेणारे प्रवीण शिंदे, शशिकला येणपूरे यांचा छोटेखानी सत्कार केला. तसेच संग्रहाच्या शंभर प्रती घेतल्या ते मोहन मोरे, श्रीहर्ष फेणे आणि शरदभाऊ बुट्टे पाटील यांचाही उल्लेख केला.(Balkumar Kavitasangrah)
वीस बालमित्र मैत्रिणींना पुस्तके आणि खाऊ भेट देऊन बालदिन साजरा केला. या कार्यक्रमाची सांगता दोन बालमैत्रिणींनी मोहन काळे यांच्या कवितावाचनाने झाली.(Balkumar Kavitasangrah)
सभागृहात प्रा. अशोक बागवे, कवी सतीश सोलांकूरकर, ग्रंथाली संपादक अरुण जोशी, लेखक चांगदेव काळे, लेखक रामदास खरे, कवी निळकंठ कदम, चित्रकार सतीश भावसार, दिलीप वाघोलीकर, संजय बनसोड, धनश्री धारप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले.(Balkumar Kavitasangrah)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक