Madhav Joshi : संविधानिक कर्तव्ये पार पाडणे नागरीकांचे कर्तव्य असले पाहिजे- माधव जोशी

    27-Nov-2025   
Total Views |
Madhav Joshi
 
डोंबिवली : (Madhav Joshi) संविधानिक कर्तव्ये पार पाडणे आणि त्याचे शिक्षण आपल्या मुलांना देणे हे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य असले पाहिजे, असे संविधान अभ्यासक माधव जोशी (Madhav Joshi) व्यक्त केले आहे.(Madhav Joshi) कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या गणेश मंदिर संचालित प्र. के. अत्रे ग्रंथालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.(Madhav Joshi)
 
हेही वाचा : Indian Arts Festival : भारतीय कला महोत्सवासाठी ठाण्याच्या गीतेश शिंदे यांची निवड
 
जोशी यांनी सांगितले, आपल्या संविधानात १९७६ पासून समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यांचे (कलम ५१अ) आपण सर्वांनी कसोशीने पालन करून वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला, पर्यावरण रक्षक, सुशिक्षित,सुखी समाज निर्माण केला पाहिजे. संविधान , राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांबद्दल आदर बाळगणे, अखंडतेस बाधा आणणाऱ्या गोष्टींना विरोध करणे, संस्कृती -पर्यावरण- -सार्वजनिक मालमत्ता यांचे रक्षण करणे, बंधुता राखणे, ६ ते १० वयोगटातील मुलांना शिक्षण देणे, वैज्ञानिक दृष्टीकोन, सुधारणा आणि मानवता यांचा पुरस्कार करणे ही ती नागरिकांची संविधानिक कर्तव्ये आहेत.नागरिकांचे मूलभूत हक्क हे साधन आहे तर आर्थिक,सामाजिक समानतेवर आधारित विकसित, सुखी देश निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे.(Madhav Joshi)
 
'संविधान सर्वांसाठी' ची येणार इंग्रजी आवृत्ती
 
प्रत्येक नागरिकाने संविधानाची ओळख करून घेतली पाहिजे या उद्देशाने मी शंभर पानी 'संविधान सर्वांसाठी' पुस्तक लिहिले आहे आणि इंग्रजी आवृत्ती पुढील महिन्यात येईल, असे प्रतिपादन माधव जोशी यांनी सांगितले.(Madhav Joshi)