मुंबई : (Ram Mandir Dhwajarohan) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्यात मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी उशीरा रात्री अचानक बाबरी मशीद शिलान्यास संबंधित एका वादग्रस्त पोस्टरची चर्चा सुरू झाली. अनेक भागात लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये ६ डिसेंबरला बेलडांगामध्ये बाबरी मशीदीची पायाभरणी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पोस्टरवर या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूँ कबीर यांचे नाव लिहिण्यात आले आहे. (Ram Mandir Dhwajarohan)
अशी माहिती आहे की, यापूर्वीच आमदार हुमायूँ कबीर यांनी मशीद बांधण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की दि. ६ डिसेंबर रोजी शिलान्यास केला जाईल आणि पुढील तीन वर्षांत मशीदीचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हुमायूँ कबीर यांच्या या घोषणेनंतर देशभरात राजकीय तापमान वाढले असून अयोध्येचे संत परमहंस आचार्य यांनी कबीर विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. (Ram Mandir Dhwajarohan)
ही संपूर्ण घटना दाखवते की बाबरी मशीद आणि राम मंदिर विषय आजही अत्यंत भावनिक, विवादित आणि राजकीयदृष्ट्या ज्वलंत आहे. अशा घोषणांमुळे धार्मिक धुव्रीकरण तीव्र होते आणि सामाजिक शांतता बिघडण्याचा धोका वाढतो. धार्मिक स्थळांचे राजकारण आणि उत्तेजक विधानांमुळे निर्माण होणारा तणाव यावर सर्व पक्षांनी संयम राखणे, कायद्याचा आदर करणे आणि सामाजिक सौहार्द अबाधित ठेवणे अत्यावश्यक आहे. (Ram Mandir Dhwajarohan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक