Keshav Upadhye : निवडणुका दारी, मविआ मात्र घरी; केशव उपाध्ये यांची टीका

    26-Nov-2025   
Total Views |
Keshav Upadhyay
 
मुंबई : (Keshav Upadhye) निवडणुका दारी, मविआ मात्र घरी, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी विरोधकांवर केली आहे. राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी कुणीही प्रचाराच्या मैदानात दिसत नाही. यावरून केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांना टोला लगावला.
 
केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले की, "महाराष्ट्रभर निवडणुकीची धडाकेबाज रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार जमिनीवर आणि जनतेमध्ये प्रचाराच्या मैदानात आहेत. पण मविआ नेते कुठे?" असा सवाल त्यांनी केला.(Keshav Upadhye)
 
हेही वाचा : China : चीनकडून पुन्हा एकदा भारतीय सार्वभौमत्त्वाचा अपमान  
 
लोकांपुढे जायची हिम्मत नाही
 
"उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्या सभा कुठे पाहिल्या का? सभाच नाहीत, दौरे नाहीत, कार्यकर्त्यांना साथ नाही. रेणापूरमध्ये तर उबाठाच्या ११ उमेदवारांनी माघार घेतली. याचे कारण, पक्षाकडून शून्य सहकार्य. मेहनत नाही, प्रचार नाही, कार्यकर्त्यांना साथ नाही, लोकांपुढे जायची हिम्मत नाही आणि पराभवाला मात्र कारणांची रांग," अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.(Keshav Upadhye)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....