Tejashree Karanjule : तेजश्री करंजुले यांचा प्रचार जोरदार

    25-Nov-2025   
Total Views |
(Tejashree Karanjule)
 
कल्याण : (Tejashree Karanjule) भाजपा आणि आर.पी.आय (आठवले गट) यांच्या युतीच्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री विश्वजीत करंजुले -पाटील (Tejashree Karanjule) या 'चला भाजपा सोबत एकत्र येऊया, नवं अंबरनाथ घडूया' म्हणत जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारात भगवा ध्वज व भक्तीची एक अद्भुत लाट पाहायला मिळाली.(Tejashree Karanjule)
 
तेजश्री करंजुले (Tejashree Karanjule) यांनी हुतात्मा चौकातून मटका चौकापर्यंत निघालेल्या श्रीराम ध्वज कलश यात्रेत सहभाग घेतला. या कलश यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 'जय श्रीराम ' च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. श्रध्दा, संस्कार आणि ऐक्याचा दिव्य क्षण येथे अनुभवायला मिळाला. नगरपरिषद निवडणूकीचा प्रचार‌ अंतिम टप्प्यात आला असून तेजश्री (Tejashree Karanjule) या सुशिक्षित उमेदवार असल्याने त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त असा सशक्त अंबरनाथ घडविण्याचे आश्वासन तेजश्री यांनी दिले आहे.(Tejashree Karanjule)