Surya Water Supply Scheme : सुर्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळा दूर

मार्च २०२६ पासून मीरा-भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला प्रकल्पाचा आढावा

Total Views |
Surya Water Supply Scheme
 
मुंबई : (Surya Water Supply Scheme) मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांसोबत विस्तृत चर्चा केली.(Surya Water Supply Scheme)
 
बैठकीस मीरा–भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल नांदुरकर, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चेतन बेंबाळे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अजय आठवले, तसेच जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संदिप नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.(Surya Water Supply Scheme)
 
आता १३२ केव्ही वीजपुरवठ्यास मान्यता
 
सध्याचा ३३ केव्ही वीजपुरवठा अपुरा पडत असून सुर्या जलयोजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्याने पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत होता. महापारेषणने सुर्या जलयोजनेसाठी १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे. हा वीजपुरवठा दिवा मार्गे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १३२ केव्ही पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे. या नव्या वीजपुरवठ्यामुळे पंपांची कार्यक्षमता १००% होईल, योजनेंतील २१८ लाख लीटर पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल, तसेच मीरा–भाईंदर शहराला नियोजित, स्थिर आणि वाढीव जलपुरवठा मिळणार आहे.(Surya Water Supply Scheme)
 
हेही वाचा : MHADA : एकल इमारतींच्या प्रस्तावांना म्हाडा आठवड्याभरात मंजुरी देणार 
 
ट्रान्सफॉर्मर उभारणी कामांना वेग
 
नव्या पारेषण लाईन व ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगाने सुरू असून, सर्व कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उर्वरित कामे देखील मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत.(Surya Water Supply Scheme)
 
मिरा - भाईंदर शहरासाठी महत्त्वाचा टप्पा
 
नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा–भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजांस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.(Surya Water Supply Scheme)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.