मुंबई : (Mumbai Metro 3 route) 'कफ परेड-वांद्रे-सीप्झ-आरे' मुंबई मेट्रो ३ मार्गिकेवर (Mumbai Metro 3 route) ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाला. आरे जेव्हीएलआरवरुन कफ परेडला जाणारी गाडी सिद्धिविनायक स्थानकात तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचे समजताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकारी-कर्मचार्यांनी धाव घेत समस्या दूर केली आणि त्यानंतर ही गाडी पुढे गेली.(Mumbai Metro 3 route)
मेट्रो ३ मार्गिकेमुळे मुंबईकरांचा आरे ते कफ परेड प्रवास अतिजलद आणि सुकर झाला आहे. त्यामुळे मेट्रो ३ मार्गिकेला (Mumbai Metro 3 route) प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत मेट्रो ३ मार्गिकेवर (Mumbai Metro 3 route) प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र अशावेळी मंगळवार,दि.२५ रोजी आरे जेव्हीएलआरवरुन कफ परेडला निघालेली मेट्रो गाडी ऐन गर्दीच्या वेळेस सकाळी १०च्या सुमारास सिद्धीविनायक मेट्रो स्थानकावर पोहचली आणि गाडी अचानक बंद पडली.(Mumbai Metro 3 route)
गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याबरोबर एमएमआारसीच्या अधिकारी-कर्मचार्यांनी गाडीतील तांत्रिक बिघाड दूर केला आणि त्यानंतर गाडी कफ परेडच्या दिशेने मार्गस्थ झाली. मात्र यात १० मिनिटांचा अवधी गेल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. गाडी १० मिनिटे सिद्धिविनायक स्थानकावर (Mumbai Metro 3 route) थांबल्याने आरे जेव्हीएलआर ते कफ परेड डाऊन मार्गावरील गाड्यांचा खोळंबा झाला. पुढे काही वेळ गाड्या ५ ते १० मिनिटे उशिरा धावत होत्या, मात्र त्यानंतर दुपारी वाहतूक सुरळीत झाली.(Mumbai Metro 3 route)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.