Ameet Satam : आमदार अमीत साटम यांच्या मार्गदर्शनात धर्म ध्वजाचे वितरण

अयोध्येतील धर्म ध्वज रोवण प्रसंगाचे औचित्य

    25-Nov-2025
Total Views |
Amit Satam
 
मुंबई : (Ameet Satam) मंगळवार दि.२५ रोजी अयोध्येतील पवित्र प्रभू श्री राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत धर्म ध्वज फडकवण्यात आला. याच शुभ प्रसंगाचे औचित्य साधत भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मुंबईत भाजपा मुंबईच्या वतीने देण्यात आलेल्या धर्म ध्वजाचे मंगळवार दि.२५ रोजी वितरण करण्यात आले.यामध्ये प्रभाग क्र ४१ मध्ये वॉर्ड अध्यक्षा अंकिता चव्हाण यांनी, प्रभाग क्रमांक १५४ बूथ नं. २४० येथे भारती गांगण ,प्रभाग क्र. १९४ मधील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, प्रभाग क्र.२८ चे वॉर्ड अध्यक्ष दिपराज सोनवणे यांनी धर्म ध्वजाचे नागरिकांना वाटप केले. (Ameet Satam)
 
हेही वाचा : भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा 'धर्मध्वज' : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
 
यावेळी नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घरोघरी दूरदर्शनवर नागरिकांनी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर येथील धर्म ध्वज रोवण सोहळा पाहिला. (Ameet Satam)