मुंबई : (Stray Dogs) सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागातर्फे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता भटक्या कुत्र्यांचा (Stray Dogs) बंदोबस्त होणार असल्याचे बोलले जात आहे. (Stray Dogs)
शासन निर्णयात काय?
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) पकडून त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि जंतनिर्मुलन करावे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचा आश्रय किंवा निवाऱ्याची सोय करावी. यासोबतच भटक्या श्वानांना खाण्याकरिता जागा निश्चित करण्यात याव्या आणि त्याच जागेवर त्यांना खायला देण्यात येत असल्याची खातरजमा करावी. इतर मोकळ्या ठिकाणी खायला देणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. (Stray Dogs)
भटक्या श्वानांच्या तक्रारींकरिता हेल्पलाईन क्रमांक
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील भटक्या श्वानांच्या तक्रारींकरिता हेल्पलाईन क्रमांक विकसित करावा आणि त्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करावे. राज्यातील सर्व महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारावे. तसेच राज्यातील राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयांनी नेहमीच अँटी रेबीज लस (Stray Dogs) आणि इम्युनोग्लोबुलिनचा अनिवार्य साठा ठेवावा. शैक्षणिक संस्था, सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्टॅण्ड, डेपो, किंवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात आढळणाऱ्या प्रत्येक भटक्या श्वानांना ताबडतोब पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करावे. त्यानंतर त्यांना नियुक्त केलेल्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात यावे आणि अशा भटक्या श्वानांना (Stray Dogs) पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. (Stray Dogs)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....