Indian Fighter Jet Tejas Crash : दुबई एअर शोमध्ये दुर्घटना! उड्डाणावेळी भारताचं लढाऊ विमान तेजस कोसळलं

    21-Nov-2025   
Total Views |

Tejas fighter jet crash
मुंबई : (Indian Fighter Jet Tejas Crash) दुबई एअर शोमध्ये शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी, प्रात्यक्षिकादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. भारतीय एचएएल तेजस हे लढाऊ विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१० वाजता प्रात्यक्षिक उड्डाण करत असताना कोसळले. अपघातानंतर वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले की नाही, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तेजस हे लढाऊ विमान खाली कोसळताना दिसत आहे आणि लगेचच अपघातस्थळावरुन काळ्या धुराचे मोठे लोट उठताना पाहायला मिळतात. घटनेनंतर सायरनचे आवाज ऐकू आले.
दुबई वर्ल्ड सेंट्रलमधील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. हे विमानतळ दुबईच्या द्वैवार्षिक एअर शोचे आयोजन करते, ज्यात या वर्षी एमिरेट्स आणि फ्लायदुबई या विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर विमानांच्या ऑर्डर्स जाहीर केल्या आहेत.घटनेबाबत भारतीय हवाई दलाकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\