‘राहुल गांधी बोलतात, अन् आम्ही जिंकतो’

    21-Nov-2025
Total Views |

Rahul Gandhi
 
गोरखपूर : "राहुल गांधी हे भाजपचे खूप मोठे प्रचारक आहेत. त्यांनी शक्य तितके आमच्याविरुद्ध बोलले पाहिजे. त्यांनी बोलणे थांबवू नये; जर ते बोलले तर आपण जिंकू. त्यांच्या भाषणात जादू आहे," अशी टिप्पणी गोरखपूरचे खासदार रवी किशन शुक्ला यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना केली.
 
रवी किशन म्हणाले की, "१ डिसेंबर रोजी सभागृह पुन्हा सुरू होईल. राहुल गांधींना तिथेही मोठ्याने बोलावे." तीन दिवसांपासून गोरखपूरमध्ये आहेत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये सामील होत आहेत. रवी किशन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, " बिहारच्या जनतेने त्यांच्या सर्व आरोपांना आधीच उत्तर दिले आहे, ज्यात मत चोरीचाही समावेश आहे. सध्या पाच ते सहा राज्यांमध्ये त्यांची सरकारे आहेत. लवकरच, तीही राज्ये जातील. राहुल यांनी न थांबता बोलत राहावे, अशी आमची इच्छा आहे."