मुंबई : (Asiatic Society Elections) दोन शतकाहून अधिक काळ अभ्यासकांच्या सेवेत असलेली एशियाटिक सोसायटी मागच्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. निवडणूकीतील राजकीय हस्तक्षेप, सदस्यांची भरती आदी कारणांमुळे एशियाटिकची निवडणूक (Asiatic Society Elections) चर्चेचा विषय बनली होती. दि. ०७ नोव्हेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये समितीकडून निवडणूक (Asiatic Society Elections) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मात्र, माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मागच्या काही काळापासून विलंबित झालेली ही निवडणूक आता २० डिसेंबर रोजी पार पडणार असल्याची चर्चा आहे. यावर अद्याप अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला नसून, २१ नोव्हेंबर पर्यंत सदस्यत्व घेतलेल्या व शुल्क भरलेल्या सभासदांना निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. (Asiatic Society Elections)
२१ नोव्हेंबर नंतर शुल्क भरलेल्या सदस्यांना सोसायटीचे सदस्यत्व मिळेल, मात्र मतदानाच्या अधिकारापासून ते वंचित राहणार आहेत. या कारणामुळे पुन्हा एकदा नवा वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एशियाटिक सोसायटीची निवडणूकामध्ये (Asiatic Society Elections) असलेला राजकीय हस्तक्षेप, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेला कर्मचारीवृंद आदी या निवडणूकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या गिरधर शेट्टी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, एशियाटिकचा प्रशासनवर्ग नव्या निवडणूक (Asiatic Society Elections) अधिकाऱ्याच्या शोधत आहे.
" एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून निवडणूक (Asiatic Society Elections) प्रक्रिया लवकरत लवकर पूर्ण व्हावी यासाठी आम्ही कार्यरत आहोत. २० डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. दिनांक २१ नोव्हेंबर पर्यंत एशियाटिक सोसायटीचे सदस्य झालेल्या व शुल्क दाखल केलेल्या पात्र सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. मतदारांची यादी अद्यावत करण्यासाठी आम्ही सगळेच झटतो आहोत, मात्र, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे या कामाला विलंब होतो आहे. मतदार यादीतून कुणाचेही नाव वगळले जाऊ नये याची आम्ही काळजी घेणार आहोत." (Asiatic Society Elections)
- प्रा. विस्पी बालापोरिया, अध्यक्ष एशियाटिक सोसायटी
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.