मुंबई : (Dondaicha Nagar Parishad Election) राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्य निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यातच आता आज (दि.२१) अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख होती. अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये भाजपचे उमेदवार बिनरोध निवडून येत आहे. धुळ्यात देखिल हेच चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेत (Dondaicha Nagar Parishad Election) मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी जादू केली आहे. संपूर्ण दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच बिनविरोध नगरपरिषद ठरली आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे.
नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री
धुळ्यातील दोंडाईचा नगपरिषदेच्या (Dondaicha Nagar Parishad Election) स्थापनेनंतर या वर्षी पहिल्यांदाच निवडणूक होणार होती, मात्र मविआच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज आज (दि.२१) माघारी घेतले. यामुळे हि नगरपरिषद बिनविरोध झाली आणि नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या मातोश्री मातोश्री नयनकुंवरताई रावल या बिनविरोध निवडून आल्या.
मविआ उमेदवाराचा अर्ज अवैध...
दोंडाईचा वरवडे नगर परिषद निवडणुकीत (Dondaicha Nagar Parishad Election) भाजपकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र छानणी प्रक्रिया मंगळवारी (दि. १८) पार पडली. या छाननीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. यामुळे नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री मातोश्री नयनकुंवरताई रावल या बिनविरोध निवडून आल्या आहेत.