संगमेश्वर संकटग्रस्त रानकुत्र्यांना पुरले; परप्रांतीयांचे प्रताप

    20-Nov-2025
Total Views |
wild dog death
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - संगमेश्वरमधील कोंडीवरे गावात विजेचा धक्का लागून रानकुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परप्रांतीयांना त्यांना पुरल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली (wild dog death). शेताभोवती लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून रानकुत्र्यांचा मृत्यू झाला (wild dog death). त्यानंतर दोन परप्रांतीय इसमांनी त्यांना पुरुन पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याबद्दल वन विभागाने त्यांना अटक केली (wild dog death). रानकुत्रे हे संकटग्रस्त प्रजात असून सध्या असंरक्षित क्षेत्राबाहेर त्यांची संख्या वाढली आहे. (wild dog death)
 
 
कोंडिवरे गावात १९ नोव्हेंबर रोजी साबुदाणा बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून दोन रानकुत्रे मृत झाल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वनकर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता रानकुत्रे जागेवर आढळून आले नाहीत. त्याठिकाणी काम करणाऱ्या इसमांना घटनेबाबत विचारणा केली असता त्यांनी रानकुत्रे बागेमध्येच खड्डा करुन पुरल्याचे दाखविले. त्यानंतर खड्डा उकरुन पुरलेले मादी आणि नर असे दोन रानकुत्रे वनकर्मचाऱ्यांना आढळले. या रानकुत्र्यांना खड्ड्यात पुरणारे केरळचे मजूर जाॅर्ज पी.व्ही. आणि उत्तरप्रदेशचे धनश्याम यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला असून आवश्यक कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे.