State Level Bankers Committee : मुंबई शहर व उपनगरात हक्क न सांगितलेल्या मालमत्तेसाठी २१ नोव्हेंबरला विशेष शिबिरे
20-Nov-2025
Total Views |
मुंबई : (State Level Bankers Committee) मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हा अग्रणी बँकेतर्फे हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या निपटाऱ्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून बँका व विविध वित्तीय संस्थांमध्ये निष्क्रिय राहिलेल्या ठेवी, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी आणि इतर आर्थिक मालमत्तेबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.(State Level Bankers Committee)
शिबिरांमध्ये नागरिकांना निष्क्रिय खात्यांची पडताळणी, दाव्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच विविध बँकांच्या प्रतिनिधींशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध होणार आहे. (State Level Bankers Committee) तसेच ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत केली जाणार असून, योग्य हक्कदारांना त्यांच्या मालमत्तेचा दावा करण्याबाबत समुपदेशन दिले जाणार आहे.(State Level Bankers Committee)
राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या निष्क्रिय ठेवी व मालमत्तेबाबत माहिती मिळवण्यासाठी या शिबिरात सहभागी व्हावे.(State Level Bankers Committee)
मुंबई उपनगर उत्तर भारतीय संघ, टीचर्स कॉलनी मागे, वांद्रे (पूर्व)
वेळ : सकाळी १० ते दुपारी २
मुंबई शहर जिल्हा:
यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृह, नरिमन पॉईंट
वेळ : दुपारी ३ ते सायं ६
या शिबिरादरम्यान बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आणि संबंधित संस्था उपस्थित राहणार असून नागरिकांना त्यांच्या आर्थिक हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.(State Level Bankers Committee)