Mahametro Mira - Bhayander : डिसेंबर अखेर महामेट्रो मिरा - भाईंदर करांच्या सेवेत : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    20-Nov-2025
Total Views |
Mahametro Mira - Bhayander
 
ठाणे : (Mahametro Mira - Bhayander) तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून सन २००९ मध्ये मिरा -भाईंदर (Mahametro Mira - Bhayander) वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो (Mahametro Mira - Bhayander) सुरू करण्याचे नियोजन असून मिरा -भाईंदर वासियांसाठी (Mahametro Mira - Bhayander) हा एक आनंद क्षण असणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दहिसर ते काशिमिरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलत होते. त्यांच्या सोबत महामेट्रोचे अधिक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सलागार कंत्राटदार टीम होती.(Mahametro Mira - Bhayander)
 
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी मी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती. परंतु गेल्या १४ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुरावाला अखेर यश येताना दिसत आहे.सन.२०१४ मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झाले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशिमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या (Mahametro Mira - Bhayander) कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदर वासीय मेट्रो ने अंधेरी पर्यंत जाऊ शकतात. तसेच तिथून मेट्रो १ चा वापर करून एअरपोर्ट स्थानक ३ मधून थेट कुलाबापर्यंत देखील जाऊ शकतात.त्यामुळे नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबई तील मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्क द्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.(Mahametro Mira - Bhayander)
 
हेही वाचा : Al-Falah University : अल-फलाह विद्यापीठात मोठा घोटाळा : ईडीची कारवाई, कर्मचारी-विद्यार्थी अचानक गायब  
 
डिसेंबर -२०२६ अखेर मेट्रो सुभाष चंद्र बोस मैदानापर्यत :
 
दहिसर - काशिमिरा ही मेट्रो डिसेंबर- २०२६ पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे . त्याबरोबरच वसई- विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई- विरार पासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक interchange ने थेट कुलाबापर्यंत मेट्रोची जाळ्यातून सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते. असा आशावाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.(Mahametro Mira - Bhayander)
 
सीएमआरएस प्रमाणपत्र नंतर दहिसर - काशिमीरा मेट्रोला हिरवा कंदील :
 
दहिसर ते काशिमिरा या नव्या मेट्रो (Mahametro Mira - Bhayander) मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन येईल. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.(Mahametro Mira - Bhayander)